
Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात की जे पाहून खळखळून हसू येतं तर कधी संतापही व्यक्त कारावा लागतो. वृद्ध आजी-आजोबा यांचे देखील अनेक व्हिडिओ आजवर व्हायरल झाले आहेत. आता देखील असाच एक वृद्ध बाबांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Video)
वयस्कर व्यक्तींना आपल्या आरोग्याची आणि शरीराची फार काळजी घ्यावी लागेत. वयानुसार हाडं ठिसूळ झालेली असतात. त्यामुळे जर एखादा अपघात झाला अथवा पडझड झाली तर वृद्ध व्यक्तींना कायमचं अपंगत्व येण्याची शक्यता असते. मात्र सोशल मीडियावर एक असे बाबा व्हायरल झाले आहेत ज्यांची करामत पाहून ते अद्यापही विशीतील तरुण आहेत की काय? असे जाणवते.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा रसत्यावर दुचाकी चालवत आहेत. दुचाकी चालवताना त्यांनी भन्नाट स्टंट केलाय. हे आजोबा चालत्या दुचाकीवर हात सोडून म्हणजे हँडल न पकडता धावत्या दुचाकीवर बसले आहेत. फक्त एवढ्यावरचं हे आजोबा थांबले नाही तर पुढे त्यांनी आणखी भयानक स्टंट देखील केले.
अंगात झब्बा पायजमा घातलेल्या या बाबांनी थेट धावत्या दुचाकीवर बसल्या जागी टणाटण उड्या मारल्यात. त्यानंतर बसूनच ते दुकाचीवर मागे झोपत आहेत. आजोबांनी केलेल्या या स्टंटला पाहून सगळेच चकित झालेत. बाबा या वयात असे आहेत तर जवाणीत कसे असतील असा विचार सर्वजण करत आहे. काही नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे इमोजी पाठवलेत. तर काहींनी बाबांच्या स्टंटचे कौतुक केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.