Morocco Earthquake video: भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकला चिमुकला, श्वास घेण्यापुरत्या जागेत देतोय झुंज, VIDEO व्हायरल

Earthquake Child Trapped: इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चिमुकला दबलाय त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Morocco Earthquake
Morocco EarthquakeSaam Tv

Earth quake Child video:

दक्षिण आफ्रिकाच्या मोरोक्को येथे ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप (Earth quake) झाला. जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, गेल्या १२० वर्षातील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून १८ किलोमीटर खाली होता. भूकंपात आतापर्यंत ६३२ जणांचा मृत्यू झालाय. परंतु दैव बलवत्तर असेल तर यमदेवालाही माघारी जावं लागतं. याचा प्रत्यय या व्हिडिओतून आला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक चिमुकला दबला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या मुलाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. चौधरी परवेझ नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मोरोक्को येथील असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान भूकंपग्रस्त भागातील वीजप्रवाह खंडीत झालाय. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार शुक्रवारी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी भूकंप आला.

Morocco Earthquake
Earthquake Video: मोरोक्कोमध्ये सर्वात मोठा भूकंप, आतापर्यंत २९६ जणांचा मृत्यू; शेकडो इमारती कोसळल्या, पाहा VIDEO

मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो देखील पोस्ट केली आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे ढग पाहायला मिळत आहेत. दरम्यान, मोरक्कोमधील या भूकंपामुळे संपूर्ण देशभरातून भावनिक प्रतिक्रिया येत आहेत.

मोरोक्कोमध्ये भूकंप आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे जीवित आणि आर्थिक हानी झालीय. त्यांच्या या दु:खाच्या काळात माझी संवेदना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. जखमी झालेले लवकर बरे व्हावेत. त्यांच्या या कठीण वेळी भारत मोरोक्कोला शक्य असेल ती मदत करण्यास तयार आहे, असं पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल साईटवर(आधीच्या ट्विटरवर) दु: ख व्यक्त करताना म्हटलंय.

Morocco Earthquake
Morocco News | मोरोक्कोमध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप!

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com