
Mother Beating Son On Road Viral Video: आज जागतिक मातृदिन मोठ्या उत्साहात (Mothers Day 2023) सर्वत्र साजरा केला जात आहे. आयुष्यात लढायला, घडायला शिकवणाऱ्या, संस्काराची शिदोरी देणाऱ्या माऊलीचं कौतुक करण्याचा हा खास दिवस. आई आणि वडिल आपल्या मुलांसाठी नेहमीच झटत असतात. मुलाच्या भविष्यासाठी, आरोग्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात.
लहान असताना अनेकांनी आपल्या आईचा मार खाल्ला असेल. आईने धु- धु धूतला असेल. पण त्यामागे कारण आपल्याचं भल्याच असतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक सुंदर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आई भररस्त्यात मुलाला चोपताना दिसत आहे. पण त्यांच कारण अगदी खास आणि कौतुक करण्यासारखं आहे बरं.. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, चला जाणून घेवू...
सध्या वाढते रस्ते अपघात हा सर्वत्र चिंतेचा विषय ठरत आहे. या वाढत्या अपघातांना अनेकदा आपलाद हलगर्जीपणा किंवा वाहतुकीचे नियम न पाळण्याचा आडमुठेपणाही कारणीभूत ठरतो. त्यामुळे आपल्याला नेहमी हेल्मेट घालून गाडी चालवावी, असे सांगितले जाते. मात्र मुले नेहमीच या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही आईने याचमुळे मुलाला फैलावर घेतल्याचे दिसत आहे. मुलाने हेल्मेट न घातला गाडी चालवत असल्याचे आईच्या लक्षात येते. ज्यामुळे ती संतापते आणि पाठलाग करुन गाडी थांबवत बिचाऱ्याला भर रस्त्यात चोपून काढत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Latest Marathi News)
व्हिडिओमध्ये (Viral Video) एक मुलगा आणि मुलगी बुलेटवरुन प्रवास करताना दिसत आहेत. दोघांच्याही हातात हेल्मेट आहे. मात्र ते न घालताच ते प्रवास करत आहेत. गाडी सिग्नलला थांबल्यानंतर पाठीमागून त्यांची आई थेट धावत येते आणि मुलाला फैलावर घेते. हेल्मेट काय दाखवायला दिलंय का म्हणत ती भररस्त्यात त्याला मारत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मुलाने हेल्मेट न घातल्याने आई इतकी संतापलीय की, त्याच्याशी वाद घालून तिचा जीव अक्षरशः कासावीस झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अपघात व्हायला एक क्षण लागतो का असे म्हणत ती हेल्मेट घालण्याचे फायदे सांगत मुलासोबत भांडताना यामध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तोंड भरुन कौतुक केले आहे.
या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी आई असावी तर अशी म्हणत कौतुक केले आहे. तर काही जणांनी मदर्स डे ला पाहिलेला हा सुंदर व्हिडिओ आहे, अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आईने दिलेला हेल्मेट घालण्याचा संदेश आजपासून न चुकता पाळा, असेही आवाहन अनेकांनी केले आहे. (Mother Beating Son For Riding Without Helmet)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.