Viral Video: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईसाठी मुलाने जे काही केलं ते पाहून तुम्हालाही अश्रू आवरणार नाही; ह्रदयस्पर्शी Video एकदा पाहाच

Mothers Day Viral Video: एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार आहे.
viral video
viral videoinstagram

Mothers Day 2023: सध्या सोशल मीडियाचा क्रेझ भरपूर वाढत चालला आहे. आपण दिवसभरात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहतो आणि कमेंट करून सोडून देतो. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की, आपण हा व्हिडिओ पाहून वेळ वाया घालवला.

मात्र काही व्हिडिओ असे देखील असतात जे पाहून आपल्याला जाणवतं की, माणुसकी अजूनही जिवंत आहे. हे व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. दरम्यान मदर्स डेच्या दिवशी एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार आहे.

viral video
Parineeti Raghav Viral Video : बाबो! राघवने इकडे-तिकडे पाहिलं आणि पटकन परिणीतीला...; रोमॅन्टीक Video व्हायरल

इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक हेयर स्टायलिस्ट तरुण एका महिलेचे केस कापताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ @guido.magalhaes या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओत असलेला तरुण ब्राझीलचा असून तो पेशाने हेअर स्टायलिश आहे. ती महिला त्या तरुणाची आई आहे. त्याच्या आईला कॅन्सर झाला आहे. त्यामुळेच त्या आईला आपले केस कापावे लागत आहेत.

तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता की, तो तरुण आपल्या आईचे केस कापत असताना आईला बरं वाटावं म्हणून स्वतःचेही केस कापायला सुरुवात करतो. हे पाहून आईला देखील अश्रू अनावर होतात.

हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारा आहे. आईला एकटं वाटू नये म्हणून त्या तरुणाने स्वतः चे केस कापले. इतकेच नव्हे तर आईला भावनिक आधार देण्यासाठी मुलासह त्याच्या मित्रानी देखील केस कापण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आईला नक्कीच असं वाटलं असेल की, या लढाईत मी एकटी नाहीये. कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधाराचाही तितकीच गरज असते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ १० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच मदर्स डेच्या दिवशी मुलाने आपल्या आईसाठी जे केलं आहे त्यावरून त्याचं कौतुक देखील केलं जात आहे. (Latest news in marathi)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com