
भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांचा लाडका माही सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून सुट्टीचा आनंद घेत आहे. याच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा ऑटोग्राफनंतर चाहत्याकडे चॉकलेट मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धोनीचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड भावला आहे. (Latest Marathi News)
महेंद्र सिंह धोनी हा आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यशस्वी कर्णधार राहिला आहे. या वर्षीचा आयपीएल सिजन झाल्यानंतर धोनीच्या गुडघ्याची शस्रक्रिया झाली होती. धोनी सध्या आता तंदुरुस्त दिसत असून अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेत आहे.
याचदरम्यान, धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील धोनीचा साधेपणा चाहत्यांना चांगला भावला आहे .
अमेरिकेतील रस्त्यावर फिरत असताना अचानक एक चाहता धोनीजवळ आला. त्या चाहत्याने छोट्या बॅटवर धोनीकडे ऑटोग्राफ मागितला. त्यावेळी धोनीने पटकन ऑटोग्राफ दिला. त्यानंतर धोनीने चाहत्याकडील चॉकलेट बॉक्स मजेशीर अंदाजात मागितला. धोनीचा हाच व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.
तत्पूर्वी, महेंद्र सिंह धोनीने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळण्याच्याही आनंद लुटला. त्यांचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहेत.
धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर धोनी आता फक्त आयपीएलमधील सामन्यात खेळताना दिसतो.
आयएपीएलच्या १७ व्या सिजनमध्ये धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. धोनी शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त दिसत आहे. मात्र, यंदाच्या आयपीएल सिजनमध्ये खेळण्याविषयी धोनी लवकरच निर्णय जाहीर करणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.