Mumbai Local Train Dance Video: लोकल ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा पोल डान्स; नेटकऱ्याने थेट मुंबई पोलिसांनाच टॅग केलं

Mumbai Local Train Dance Video: एका तरुणीने लोकल ट्रेनच्या दरवाजात पोल डान्स केला आहे.
Mumbai Local Train Dance Video
Mumbai Local Train Dance VideoSaam tv

Mumbai Local Train Dance Video:

मुंबईची लोकल ट्रेन म्हटलं तर गर्दी ठरलेली असतेच. रोजच प्रवाशांना भरगर्दीत ट्रेनमधून प्रवास करावा लागतो. सकाळचा वेळ सोडला तर दुपारच्या वेळेत काही मार्गावर लोकल डब्ब्यात फारशी गर्दी नसते. हीच वेळ साधत एका तरुणीने लोकल ट्रेनच्या दरवाजात पोल डान्स केला आहे. या तरुणीचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तरुणीच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी महिलांचा लोकल ट्रेन पकडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कामाला जाणाऱ्या महिलांची देखील धावती ट्रेन पकडण्याची लगबग कॅमेरात कैद झाली होती.

सकाळी कामाला जाणाऱ्या या महिलांच्या व्हायरल व्हिडिओनंतर आता एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तरुणीच्या हटके डान्सचा व्हिडिओ मुंबई मॅटर्स या 'एक्स' अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Mumbai Local Train Dance Video
Two Men Fight In Mumbai local: लोकल ट्रेन आहे की कुस्तीचा आखाडा? सीटवर बसण्यावरून वाद, दोन प्रवाशांची तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

निळा रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या या तरुणीचा पोल डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या तरुणीने लोकल ट्रेनमध्ये बेली डान्स करत तिची हटके कला सादर केली आहे.

या तरुणीने मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड ते मस्जिद स्थानकादरम्यान डान्स केल्याचं सांगण्यात येत आहे. या तरुणीचा डान्स पाहून काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. तर काहींनी कौतुक केलं आहे. तर एका नेटकऱ्याने थेट मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.

एका युजरने म्हटलं आहे की, 'लोकल ट्रेनचा वापर केल्याबद्दल तरुणीवर कारवाई केली पाहिजे'. दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, 'दिल्ली मेट्रोमध्ये असं कृत्य केलं जायचं, ते कमी होतं का...की आता मुंबई लोकल ट्रेनमध्येही सुरू झालं आहे. हा संसर्गजन्य रोग वेगाने पसरत आहे'.

एका तरुण नेटकऱ्याने या तरुणीचा व्हिडिओ थेट मुंबई पोलिसांना टॅग केला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात रेल्वे पोलिसांना लक्ष घालण्यात सांगितलं आहे. आता रेल्वे पोलीस या तरुणीवर काय कारवाई करतात, हे पाहावे लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com