Snake In Ladies Chaos: बापरे बाप! लेडीज डब्ब्यात शिरला साप; महिलांची उडाली धांदळ, पुढे काय झालं? पाहा व्हिडीओ

Mumbai Local Train Viral Video: कुणाच्याही ध्यानीमनी नसणारी एक खळबळजनक घटना मुंबई लोकलमध्ये घडली आहे.
Snake In Ladies Chaos
Snake In Ladies ChaosSaam TV

Mumbai Local Viral Video:

मुंबई लोकल ट्रेन नेहमीच गर्दीने भरलेली असते. लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लोकल ट्रेनचे व्हायरल झालेले आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अशात कुणाच्याही ध्यानीमनी नसणारी एक खळबळजनक घटना मुंबई लोकलमध्ये घडली आहे. मुंबई लोकलमधील महिलांच्या डब्यात साप सापडला आहे. (Latest Marathi News)

Snake In Ladies Chaos
Gautami Patil: तुम्हा बघून तोल माझा गेला… नाचता नाचता गौतमी स्टेजवरच कोसळली, पाहा VIDEO

सदर घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांचा डब्बा म्हटल्यावर कान फाटतील एवढी बडबड ऐकू येते. जरा कुणाचा धक्का लागला की महिलांच्या डब्ब्यात हाणामाऱ्या सुरू होतात. महिलांच्या हाणामारीचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. अशात पहिल्यांदाच महिलांच्या डब्ब्यांत चक्क सापाने एन्ट्री मारली आहे.

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात जर कोणता पुरूष आला तर त्या आरडाओरडा करतात. अशात चक्क सापाने डब्ब्यात हजेरी लावल्याने सर्वच महिलांची बोलती बंद झाली. भांडणांचे आवाज शांत झाले आणि सर्वजण साप शोधू लागले. एका महिलेला सीटखाली एक साप वेटोळे घालून बसलेला दिसला होता.

घटनेची माहिती आरपीएफ पोलिसांना देण्यात आली. पुढील स्टेशन येताच पोलीस आणि आरपीएफ जवान महिलांच्या डब्ब्याजवळ आले. त्यांनी संपूर्ण डब्ब्यात तपासले. मात्र साप त्यांना साप काही मिळाला नाही. आता साप खरंच आला होता? की ही फक्त एक अफवा होती असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये विचारला आहे.

Snake In Ladies Chaos
Tractor Accident Viral Video: भयंकर अन् विचित्र अपघात... ट्रॅक्टर चोरायला गेला अन् थेट चाकाखाली सापडला| थरकाप उडवणारा VIDEO

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com