Airport Fight Viral Video : चापट, लाथा, बुक्क्या... विमानतळ बनलं कुस्तीचा आखाडा, महिलासह डझनभर लोक एकमेकांवर तुटून पडले

Viral Video : अमेरिकेच्या शिकागो आंतरराष्ट्रीय विमातळावरील हा व्हिडीओ आहे.
Viral Video
Viral Video Saam TV

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाचा एका विमानतळावरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनेकजण एकमेकांशी भिडताना दिसत आहे. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे.

माहितीनुसार, अमेरिकेच्या शिकागो आंतरराष्ट्रीय विमातळावरील हा व्हिडीओ आहे. या प्रकरणी अमेरिकेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest News)

Viral Video
King Cobra Viral Video: माकडाचे माकडचाळे पाहून किंग कोब्रा थेट उभा राहिला; पुढे जे घडलं ते भयंकरच...

शिकागो विमानतळाच्या बॅगेज एरियामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. एका २४ वर्षीय महिलेवर दोन जणांनी हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला थापड मारताना दिसत आहे. विमानतळावरील सुरक्षारक्षकांना भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत कुणीही नव्हतं. (Viral Video)

Viral Video
IPL 2023, MI vs GT: मुंबईची कामगिरी दमदार, तरी फॅन्स गपगार; रोहितमुळे मुंबई इंडियन्सची घाबरगुंडी!

त्यानंतर हिरव्या टी-शर्टमधील व्यक्ती देखील मारताना दिसत आहे. त्यानंतर काही महिला देखील या भांडणात उतरतात आणि एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत. पोलिसांनी या घटनेशी संबंधित अन्य कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, शिकागो विमान वाहतूक विभागाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com