Youtuber Accident Video: स्टंट करताना तोल गेला अन्... प्रसिद्ध युट्यूबरचा भीषण अपघात, गाडी थेट हवेत उडाली| भयानक VIDEO

Popular Youtuber TTF Vasan Accident Video: बलुचेट्टी चथिराम येथे सर्व्हिस लेनवर तो आपल्या बाईकवर जीवघेणा स्टंट करत होता. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला.
Popular Youtuber TTF Vasan Accident Video
Popular Youtuber TTF Vasan Accident VideoSaamtv

Youtuber Bike Accident Viral Video:

सध्या तरुणाईला लागलेले सोशल मीडियाचे वेड भीषण आणि भयंकर आहे. सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्याच्या नादात तरुण- तरुणी असे जीवघेणे स्टंट करतात, ज्यामुळे अनेकांचा जीवही जातो. अशाच एका युट्यूबरच्या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Popular Youtuber TTF Vasan Accident Video
Gopichand Padalkar News : ...तर आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेन्नईचा (Chennai) प्रसिद्ध युट्यूबर आणि बाईक रायडर टीटीएफ वासन याचा रविवारी (17, सप्टेंबर) भीषण अपघात झाला. टीटीएफ वासन (TTF Vasan) चेन्नईकडून कोईम्बतूरला जात असताना ही दुर्घटना घडली. बलुचेट्टी चथिराम येथे सर्व्हिस लेनवर तो आपल्या बाईकवर जीवघेणा स्टंट करत होता.

यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटून तोल गेल्याने गाडी थेट रस्ता सोडून खाली गेली. या अपघातात तो टीटीएफ वासन गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भयंकर अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, युट्यूबर अत्यंत सुसाट वेगात बाईकवर जीवघेणा स्टंट करत आहे. भरधाव वेगात त्याने समोरुन गाडी उचलून पाठीमागील चाकांवर पळवण्याचा प्रयत्न करत आहे. अचानक त्याचा तोल जातो आणि गाडी रस्ता सोडून थेट खाली आदळते.

हा अपघात इतका भयंकर होता की प्रचंड वेगात असल्याने बाईक अक्षरशः हवेत उडाली. गाडीवरील तरुणही पाठीमागेच उडून पडतो. मात्र सुदैवाने गिअर प्रोटेक्शनमुळे त्याचा जीव वाचला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या युट्यूबरकडून अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून त्याला दंडही भरावा लागला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशा युट्यूबर्सवर बंदी घालण्याची मागणी केली असून त्यांचेच अनुकरण इतर मुले करतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काही जणांनी त्याचा चॅनेल बंद करण्याचेही सांगितले आहे. (Latest Marathi News)

Popular Youtuber TTF Vasan Accident Video
Shiv sena Crisis: निवडणूक आयोगाचा 'तो' निर्णय सुप्रीम कोर्ट रद्द करणार? घटनातज्ज्ञ काय म्हणाले, वाचा...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com