Viral Accident : हो, ठोक त्याला ! कारमधील तरुणांची मस्करी, सायकलस्वाराला चिरडलं; व्हिडिओ व्हायरल

Viral : एका कार चालकानं मस्करीसाठी ६४ वर्षाच्या एका सायकलस्वाराला चिरडल्याची घटना घडलीय.
Viral Accident Video
Viral Accident VideoSaam Tv

Viral Accident Video:

सोशल मीडियावर लाईक मिळवण्यासाठी नेट युझर्स कोणतेही व्हिडिओ पोस्ट करत असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारमधील युवकांनी मस्करीत एका सायकलस्वाराला कारनं धडक दिली आणि तेथून पसार झाले. (Latest Viral News)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार चालवणाऱ्या व्यक्तीला त्याचा मित्र म्हणतो की, हा ठोक त्याला., हे शब्द आपण स्पष्टपणे ऐकू शकतो. त्यानंतर कार चालक जाणूनबुजून सायकलस्वाराला धडक मारतो. दरम्यान हा व्हिडिओ लॉस वेगास येथील आहे. वृत्तानुसार, ह्युंदाईच्या १७ वर्षाच्या चालकाला घटनेनंतर लगेचच अटक करण्यात आली. व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल साईटवरून हटवण्यात आलाय.

लॉस वेगासच्या पोलिसानुसार, सायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. सायकलस्वारचं वय ६४ वर्ष असून त्याच एंड्रियास प्रोबस्ट आहे. ते एक निवृत्त पोलीस अधिकारी होते. एंड्रियास हे १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सायकलस्वारी करत होते. तेव्हा एका कार चालकानं त्यांना जाणूनबुजून धडक दिली. दरम्यान एंड्रियास यांना कारनं धडक दिल्यानंतर त्यांना लगेच यूनिवर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

nypost च्या वृत्तानुसार, व्हिडिओच्या सुरुवातीला, कारमधील तरुण पश्चिम सेंटेनिअल पार्कवेजवळ उत्तर तेनाया वे वर वेगाने चालणाऱ्या दुसऱ्या कारला शिव्या देताना दिसतात. त्याच दरम्यान त्याची नजर सायकल चालवणाऱ्या एंड्रियासवर पडली. मग कारमध्ये बसलेला तरुण कार चालकला म्हणतो की, तयार आहेस ना? मग ते दोघेही हसत म्हणतात की,‘हो, याला ठोक.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, सायकलला ते जोरात धडक देतात. या धडकेमुळे सायकलस्वार एंड्रियास हवेत उंच फेकले जातात आणि रस्त्यावर पडतात. कारची सायकलला धडक बसताना आणि एंड्रियास हवेत उडत असल्याचा व्हिडिओ कारमधील तरुणांनी बनवला.

Viral Accident Video
School Students: शाळेच्या बकांचा ढोल अन् कंपास पेटीचा ततड-ततड ताशा; विद्यार्थ्यांचा अफलातून व्हिडीओ व्हायरल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com