Viral Video: मित्रासोबत जीवघेणा खेळ! टायरमध्ये बसवलं, उतारावरुन ढकलून दिलं; पुढं जे घडलं ते.. व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

Truck Tyre Stunt With Friend: मित्रासोबत केलेला एक छोटा खेळ किती भयंकर ठरु शकतो... याचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Truck Tyre Stunt With Friend
Truck Tyre Stunt With FriendSaamtv

Tyre Stunt With Friend Viral Video News: अनेकदा आपण मित्रांसोबत मजा, मस्ती, चेष्टा करतो. प्रॅंक करुन त्याची खेचतही असतो. परंतु मित्रांसोबत केलेले असे स्टंट, चेष्टाही कधी कधी अंगलट येवू शकते. सोशल मीडियावर असाच एक हादरवून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मित्रासोबत केलेली एक छोटा खेळ किती महागात पडू शकतो हेच या व्हिडिओमध्ये दिसत आहे. काय आहे हा व्हिडिओ जाणून घेवू.... (Tyre Stunt Prank Video)

Truck Tyre Stunt With Friend
Mahad News: गोहत्येच्या कारणाने महाडमध्ये वाद; गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

काय आहे व्हिडिओ....

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला एकापेक्षा एक भयंकर व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा हे व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मित्रांसोबत खेळ खेळायला गेले पण भलताच प्रकार घडल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, काही मुले त्यांच्या एका मित्राला भल्यामोठ्या टायरमध्ये बसवून फिरवत आहेत. टायरमध्ये बसवल्यानंतर त्याला धक्का देवून उतारावरुन खाली फिरवण्याचा खेळ ते खेळत आहेत. परंतु, हाच खेळ त्या टायरमध्ये बसलेल्या मुलाच्या जिवावर बेततो.

Truck Tyre Stunt With Friend
Ramdas Athawale News: मुंबईची हवा खावी व उमेदवार निश्चित करावा; रामदास आठवले यांचा टोला

मित्राला टायरमध्ये बसवून फिरवलं...

टायरमध्ये मित्राला बसवल्यानंतर सर्वजण त्याला उतारावरुन धक्का देतात. उतार लागल्याने टायर वेग पकडत जोराने पळायला लागतो. धक्के आणि जोराने आदळत टायर पुढे निघाल्याने मुलाला त्रास व्हायला लागतो. भयंकर म्हणजे अचानक टायर मुख्य रस्ता सोडतो आणि थेट दरीकडे वळतो.

थेट दरीत....

इतर मित्र टायरला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र मोठा उतार असल्याने टायर काही थांबत नाही आणि तो जोरात आदळत खाली दरीच्या दिशेने पळत अगदी दिसेनासा होतो. ही दरी प्रचंड खोल आणि धोकादायक आहे. टायरमध्ये बसलेल्या मुलाचे पुढे काय झाले.. याबद्दल काही कल्पना नाही, मात्र हा व्हिडिओ भयानक आहे.

नेटकऱ्यांचा सल्ला...

ट्वीटरवर (Twitter) शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ तब्बल ४ मिलियन लोकांनी पाहिला असून त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ भयंकर असल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी सर्वांचेच मित्र असेत असतात.. अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी असा जीवघेणा स्टंट न करण्याचाही सल्ला दिला आहे.. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com