UP Viral Video: बापरे! बाळाला उकळत्या दुधाने घातली अंघोळ; चिमुकला वेदनेने विव्हळत होता अन्... थरकाप उडवणारा व्हिडिओ

Govardhan Pooja Viral Video: गावातील लोकांनी मात्र ही पुजा म्हणजे त्यांच्या श्रद्धेचा भाग असल्याचे सांगितले आहे. तसेच यामुळे घरात सुख- शांती नांदते..असेही त्यांचे म्हणणे आहे.
UP Viral Video
UP Viral Video Saamtv

Baby Bath With Hot Milk Viral Video: एकविसाव्या शतकात मानवाने तंत्रज्ञानात आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. असे असले तरी आजच्या आधुनिक काळातही देशात अशा अनेक अनिष्ठ प्रथा आणि अंधश्रद्धेचे प्रकार अनेक भागात पाहायला मिळतात.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका अघोरी प्रथेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चिमुकल्या बाळाला उकळत्या दुधाने अंघोळ घातली जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केली आहे. (Viral Video News In Marathi)

UP Viral Video
Delhi Metro Fighting Video: दिल्ली मेट्रोत दे दणादण; तोंडावर चापट आणि बेदम बुक्क्या, दोन व्यक्तींमधील हाणामारीचा VIDEO व्हायरल

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलिया जिल्ह्यातील श्रवणपूरमध्ये गोवर्धन पुजेमध्ये लहान बाळाला चक्क उकळत्या दुधाने अंघोळ घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही खास पूजा पंडित वाराणसीचे पंडीत अनिल यादव यांंनी केली. यामुळे घरात सुख-शांती येते व कुटूंबावरील संकट टळते, अशी इथल्या लोकांची भावना आहे. मात्र या पुजेवेळी लहान मुलासोबत केलेल्या कृत्यामुळे नेटकरी चांगलेच भडकले आहेत. पण गावातील लोकांच्या मते ही यादव समाजाची गोवर्धन पूजेची पद्धत आहे.

UP Viral Video
Co-operative Societies Elections : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सहकार विभागाचा निर्णय, कारणही सांगितलं

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video), पंडीत अनिल यादव यांनी सर्वप्रथम शेणकुटाने चूल पेटवली आणि त्यावर मातीची भांडी ठेवत दुध गरम केले. मडक्यात दुध उकळायला लागल्यानंतर त्या गरम दुधाने बाळाला अंघोळ घालायला सुरुवात केली.

त्या दुधाचा संपूर्ण फेस संपूर्ण अंगावर लावण्यात आला. यावेळी लहान मुल वेदनेने विव्हळताना दिसत आहे. मात्र तरीही कोणीही त्याला अडवत नाहीत. उलट मुलाच्या कुटूंबातील सदस्य हात जोडून उभे असल्याचे यामध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र त्यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी त्या पंडीतावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काही जणांनी अशा अघोरी प्रथा बंद करण्याच्याही सुचना दिल्या आहेत. मात्र या गावातील लोकांनी मात्र ही पुजा म्हणजे त्यांच्या श्रद्धेचा भाग असल्याचे सांगितले आहे. तसेच यामुळे घरात सुख- शांती नांदते..असेही त्यांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com