Bride Rides On Car Bonnet: कारच्या बोनेटवर बसून नवरीचा स्वॅग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई
Wedding Photoshoot: लग्न (Marriage) हा तरुण-तरुणींच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असतो. त्यामुळे अनेक जण लग्नासाठी लाखो रुपये खर्च करतात. अशामध्ये आजकाल प्री -वेडिंग (Pre- Wedding Photoshoot), पोस्ट वेडिंग फोटोशूटचा (Post Wedding Photoshoot) ट्रेंडच आला आहे. या फोटोशूटमध्ये नवरा-नवरी काय काय करतील हे सांगता येत नाही. या वेडिंग फोटोशूटचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशामध्ये सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका नवरीच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नवरीने प्री-वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ तयार केला खरा. पण तिला हे असं करणं खूपच महागात पडलं आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका तरुणीला प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ तयार करणं चांगलंच महागात पडलं आहे. चालत्या कारच्या बोनेटवर बसून या तरुणीने स्वॅग दाखवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तयार करुन तिने सोशल मीडियावर देखील अपलोड केला. अशाप्रकारे प्री-वेडिंग फोटोशूट केल्यामुळे पोलिसांनी या तरुणीला 17 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
प्रयागराज पोलिसांनी सांगितले की, वर्णिका चौधरी नावाच्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यानंतर तिला दंड ठोठावला. सिव्हिल लाइन्सचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) भानू प्रताप यांनी सांगितले की, 16 मे रोजी तरुणीने ऑल सेंट्स कॅथेड्रलजवळ नवरीच्या पोशाखात चालत्या एसयूव्ही कारच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट केला होता. प्रयागराजमधील हे चर्च स्टोन चर्च या नावानेही प्रसिद्ध आहे.
पोलिसांनी पुढे सांगितले की, या तरुणीने काही दिवसांपूर्वी कंपनी बाग म्हणजेच चंद्रशेखर आझाद पार्कजवळ नवरीच्या पोशाखामध्ये हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना व्हिडिओ शूट केला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसयूव्हीशी संबंधित घटनेत वर्णिका चौधरीला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 15,500 रुपये आणि इतरांना 1,500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या तरुणीच्या प्रीवेडिंग शूटच्या व्हिडिओची जरा जास्तच चर्चा होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, अशाच आणखी एका घटनेत अयोध्येत दोन महिला कारच्या बोनेटवर स्टंट करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी कार मालकाला 18,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. अशाप्रकारे प्रीवेडिंग, पोस्ट वेडिंग फोटोशूट करताना नियमांचे उल्लघनं करणाऱ्या तरुण आणि तरुणींवर पोलिस दंडात्मक कारवाई करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.