
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका शिक्षिकेचा आक्षेपार्ह रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षण विभागाने घटनेची तात्काळ दखल घेत शिक्षिकेला निलंबित केलं आहे. प्रभा नेगी असं या शिक्षिकेचे नाव आहे.
शिक्षिका प्रभा नेगी यांना रीलचं एवढं वेड लागलं की त्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला. आपण कुठे काय करावं याचं भान प्रभा यांना राहिलं नाही. रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. (Viral VIdeo)
प्रभा नेगी यांचे अनेक आक्षेपार्ह डान्स आणि कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यानंतर शाळेतील शिक्षकांनी याबाबत लेखी तक्रार केली. तक्रारीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभावाने प्रभा नेगी यांना निलंबित केले आहे. तसेच दोन जणांची समिती स्थापन करून तपास सुरू केला आहे.
शिक्षिका प्रभा नेगी शाळेत सतत व्हिडिओ बनवत असत आणि सोशल मीडियावर अपलोड करतात. दरम्यान, शाळेच्या परिसराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी एका शिक्षिकेला याची माहिती मिळाली. यानंतर शाळेतील इतर शिक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली.
सध्या शिक्षण विभागाने त्यांना निलंबित केले असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही सांगितले आहे. व्हिडीओ व्हायरल होताच काही विद्यार्थी पुढे आले आणि त्यांनी दिलेली माहितीही धक्कादायक होती. शिक्षिकेने शाळेतील विद्यार्थ्यांना देखील तिचे व्हिडीओ शूट करण्यास सांगितले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.