Marriage Viral Video: लग्नाचा मंडप पतंगासारखा हवेत उडाला, वऱ्हाड्यांची धावपळ; थरकाप उडवणारा व्हिडीओ

Marriage Tent Viral Video: मध्य प्रदेशच्या झिरण्या भागातील कुसुंबिया गावात गुरुवारी ही घटना घडली.
Viral Video
Viral Video Saam Tv

Viral Video: मध्य प्रदेशमधील झिरण्या भागातील एका गावात लग्न समारंभादरम्यान वादळी वाऱ्यामुळे मंडपच उडून गेल्याची घटना घडली आहे. एखाद्या कागदी पतंगासारखा हा तंबू हवेत उडताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वादळी वाऱ्यामुळे सिलिंग पाईप असलेला 45 बाय 45 आकाराचा मंडप कागदासारखा उडून गेला. मंडप सुमारे 200 फूट उंचीवर पोहोचला होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे वऱ्हाडी मंडळींचा एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसले. काही वेळाने हा मंडप विजेच्या तारांमध्ये जाऊन अडकला. त्यानंतर मोठा आवाज झाल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. (Latest News)

Viral Video
Parineeti Raghav Viral Video : बाबो! राघवने इकडे-तिकडे पाहिलं आणि पटकन परिणीतीला...; रोमॅन्टीक Video व्हायरल

मध्य प्रदेशमधील झिरण्या भागातील कुसुंबिया गावात शुक्रवारी ही घटना घडली. लग्न समारंभासाठी शेतात मंडप लावण्यात आला होता. जवळच असलेल्या दुसऱ्या मंडपात लग्नाचे विधी पार पाडले जात होते. पाहुणे दुसऱ्या तंबूत जेवत होते. दरम्यान अचानक एक वावटळ उठली आणि मंडप पाईपसह उडून गेला. (Viral Video News)

Viral Video
Viral Video: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईसाठी मुलाने जे काही केलं ते पाहून तुम्हालाही अश्रू आवरणार नाही; ह्रदयस्पर्शी Video एकदा पाहाच

वादळादरम्यान लोक मंडप उडू नये म्हणून पाईप धरुन उभे होते. मात्र वाऱ्याचा वेग एवढा होता की मंडळ पाईप धरुन उभे असले फार वेळ तिथे थांबू शकले नाही आणि काही क्षणात मंडळ हवेत उडाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com