
Italy News: कुत्रा (Dog) हा खूपच प्रामाणिक प्राणी आहे. हाच कुत्रा कधी आपल्या घराची राखण करतो. तर कधी पोलिसांना गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मदत करतो. अशाच एका कुत्र्याने पोलिसांना अंमली पदार्थाविरोधातील मोहीमेमध्ये मोठी मदत केली आहे. इटलीमध्ये (Italy) एका कुत्र्याने तब्बल 70 टन कोकेन शोधून काढले आहे. सध्या या कुत्र्याचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इटलीमध्ये एका कुत्र्याने पोलिसांना ड्रग्जमाफीयांचा पर्दाफाश करण्यास मदत केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुत्र्याच्या मदतीने इटालियन पोलिसांनी केळीच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवलेले आणि इक्वाडोरमधून पाठवलेले 2700 किलोंचे कोकेन जप्त केले. 70 टन केळीमध्ये हा कोकेनचा साठा लपवण्यात आला होता. अत्यंत चांगल्या दर्जाच्या या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत $900 दशलक्ष म्हणजेच जवळपास 7200 कोटी रुपये असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोकेन शोधून काढण्यास पोलिसांना मदत करणाऱ्या या कुत्र्याचे नाव जोएल असे आहे.
हे कोकेन इटलीमार्गे अर्मेनियाला पाठवले जात होते. Gioia Tauro पोर्टवर आलेल्या दोन कंटेनरमध्ये पोलिसांना काहीतरी संशयास्पद आढळले. म्हणून त्यांनी या कंटेनरची तपासणी करण्यास सुरुवात केली. केळी पाठवणाऱ्या या कंपनीने यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात फळे पाठवली नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जोएल नावाच्या कुत्र्याची मदत घेतली. जोएलने संपूर्ण कंटेनरमध्ये असलेल्या केळीची पाहणी केली त्यानंतर त्याने केळीच्या ढिगाऱ्यातून कोकेनचे बॉक्स शोधून काढले.
पोलिसांनी सांगितले की, जोएल कंटेनरजवळ येताच तो लगेच वर चढला आणि पटकन केळीचा ढीग बाजूला हलवू लागला. जर जोएलला ड्रग्जचा वास पकडता आला नसता तर ते जॉर्जियामार्गे -इटलीमार्गे अर्मेनियाला पोहोचले असते. 2021 पासून आतापर्यंत या बंदरातील अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हजारो कोटी रुपयांचे 37 टन कोकेन जप्त केले आहे. इक्वाडोरसह अनेक दक्षिण अमेरिकन देशांमधून जगाच्या सर्व भागांमध्ये कोकेनची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.