Shocking Video: अरे बापरे! वादळी वारा आला अन् हत्तीच हवेत उडाला; VIDEO पाहून चक्रावून जाल

Elephant Flying in Sky: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती वादळासोबत हवेत उडून गेल्याचं दिसत आहे.
Elephant Flying in Sky Viral Video
Elephant Flying in Sky Viral VideoSaam TV

Elephant Flying in Sky Viral Video: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात वजनदार प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. (Breaking Marathi News)

हत्तीचं वजन हे सरासरी पाच ते सहा हजार किलो इतकं असतं. त्यामुळे इतक्या वजनदार प्राण्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणं काही सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड शक्तिची गरज भासेल.

परंतू सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती वादळासोबत हवेत उडून गेल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. हे नेमकं घडलं तरी कसं? इतका वजनदार प्राणी हवेत उडालाच कसा? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

हत्ती नेमका हवेत कसा उडाला?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) एक व्यक्ती एका गार्डनमध्ये उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी अचानक जोरदार वादळी वारा येतो. हा तरुण वादळी वाऱ्यापासून दूर पळतो. पण, त्याठिकाणी उभा असलेला एक हत्ती वाऱ्याने चक्क हवेत उडतो. प्रथमदर्शनी हा हत्ती खरा आहे असंच वाटतं. परंतु खरं सांगायचं झालं तर हा काही खराखुरा हत्ती नव्हता.

तर एका बर्थ डे पार्टीमध्ये वापरण्यात आलेला हत्तीच्या आकाराचा फुगा होता. त्यामुळे वादळी वाऱ्यात तो सहज उंच हवेत उडाला. व्हायरल झालेला हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हिडिओत काही लोकं एका ठिकाणी उभं राहून हा व्हिडिओ शूट करत आहेत. (Latest Marathi News)

जसा हत्ती हवेच्या वेगासोबत उडू लागला तसेच एकमेकांसोबत हसत थट्टा मस्करी करताना दिसत आहेत. पहिल्यांदा व्हिडिओ पहिल्यानंतर तो खरा हत्ती (Elephant) आहे असंच वाटतं. परंतु त्या हत्तीचं नीट निरिक्षण केलं असता. खरा प्रकार तुमच्या लक्षात येईल. या व्हिडीओवर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा हत्ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com