Viral Snake Kiss Video: अबब! चक्क 12 फुटांच्या किंग कोब्राचं घेतलं चुंबन, व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा

King Cobra Video : अबब! चक्क 12 फुटांच्या किंग कोब्राचं घेतलं चुंबन, व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा
Man kisses 12-foot-long king cobra
Man kisses 12-foot-long king cobra Saam TV

Man Kisses 12-Foot-Long King Cobra: सापाला नुसतं समोर पाहिलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. अनेकजण सापाला पाहिलं की आधी आपला जीव वाचवण्याचं बघतात. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती चक्क 12 फुटांच्या किंग कोब्राचं चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.

snake videos : 12 फूट उंचीच्या किंग कोब्राचं घेतलं चुंबन

किंग कोब्रा (king cobra video) हा अत्यंत घातक साप आहे. हा साप एकदा चावला की माणसाचं जगणं जवळपास अशक्य आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये बिशप नावाचा एक व्यक्ती 12 फूट उंचीच्या किंग कोब्राच्या जवळ जाताना दिसत आहे. इतक्या घातक सापाची जणू त्याला भीतीच नसल्याचं हा व्हिडीओ पाहताना जाणवतं. या व्हिडीओत तो किंग कोब्राचं चुंबन घेताना दिसत आहे.  (Latest Marathi News)

Man kisses 12-foot-long king cobra
Karnataka New Cm : कर्नाटकचा राजकीय पेच सुटला; सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

बिशपने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये निकने लिहिलं आहे की, तुम्ही 12 फूट किंग कोब्राचे (king cobra size) चुंबन घेऊ शकता का? या व्हिडीओवर लोकांनी अक्षरश: कमेंट्सचा पाऊस केला आहे. (Viral Video)

Man kisses 12-foot-long king cobra
Angry Mother Viral Video: आई, आईच असते! भररस्त्यात लेकाला दिला चोप, कारण ऐकून कराल कौतुक; सुंदर VIDEO पाहाच...

या व्हिडीओवर एकाने कमेंट करत लिहिलं आहे की, ''मी कॅमेरामन असतो तर त्याला सोडून आधी पळून गेलो असतो.'' दुसर्‍याने लिहिले की, ''आपला जीव धोक्यात का टाकतोय, तुझं आपल्या आयुष्यावर प्रेम नाही का?'' दरम्यान, निकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral Video)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com