Ganpati VIdeo
Ganpati VIdeo Saam TV

Ganpati Viral Video : हत्तीकडून लाडक्या बाप्पाला हार घालून मानवंदना, व्हिडीओ एकदा पाहाच

Viral VIdeo : गणेशोत्सवानिमित्ती सोशल मीडियावरही गणपतींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Ganpati Viral Video :

लाडक्या गणपती बाप्पाचं गणेश चतुर्थीला मोठ्या आनंदात आणि जल्लोषात देशभरात आगमन झालं आहे. मुंबई, पुण्यात तर गणेशोत्सव मोठ्या सणांपैकी एक मानला जातो. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई अशा प्रसिद्ध गणपतींचीदेखील आज प्राणप्रतिष्ठा झाली आहे. गणेशोत्सवानिमित्ती सोशल मीडियावरही गणपतींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणपती बाप्पाचं हत्तीने दर्शन घेतल्याची हा व्हिडीओ आहे. बाप्पांच्या गळ्यात हार घालून या हत्तीनं बाप्पाला मानवंदना दिली. आजूबाजूला उपस्थित भक्तही हे दृष्य पाहून गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देताना दिसत आहेत.

Ganpati VIdeo
Richest Ganpati In Mumbai : मुंबईतील या भागात 69 किलो सोने, 336 किलो चांदीने सजते श्रीगणेशाची मूर्ती; कारणंही आहे खास
Ganpati VIdeo
Ganesh Chaturthi 2023 Wishes : आतुरता फक्त आगमनाची..., तुमच्या प्रियजनांना पाठवा गणेश चतुर्थीच्या हटके शुभेच्छा!

व्हायरल झालेला हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Vertigo_Warrior या X अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १२ हजार लोकांना लाईक केलं आहे. तर जवळपास १५०० लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com