Viral Video
Viral VideoSaam TV

Accident Video Viral: मानवी साखळी करुन व्यक्तीला गाडीतून बाहेर काढलं, अन् काही क्षणात गाडी दरीत कोसळली; पाहा व्हिडीओ

Car Accident Survival Viral Video: काही लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन कारमध्ये बसलेल्या व्यक्तीचा जीव वाचवतात.

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक अपघातांचेही व्हिडीओ असतात. असाच एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. एखाद्या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे की काय असं वाटेल पण ही खरी घटना आहे.

गाडी चालवताना काळजी घेणे खुप महत्त्वाचं असतं. एका चुकीची तुम्हाला खुप मोठी किंमत चुकवावी लागू शकते. असाच एक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये एक कार खोल दरीत पडताना दिसत आहे. त्याआधी काही लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन कारमध्ये बसलेल्या व्यक्तीचा जीव वाचवतात. व्हायरल व्हिडिओ कुठला आहे याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

Viral Video
Rishikesh Rafting Video: फिरायला जाताय सावधान! गाईडची मनमानी, पर्यटकाला धू धू धूतलं...; कारण काय?

व्हिडीओच्या सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये एक कार अडकलेली दिसत आहे. तर काही लोक मिळून कारमध्ये बसलेल्या व्यक्तीची सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. चार लोक एकमेकांचा हात धरत खड्ड्यात अडकलेल्या कारमधील व्यक्तीला बाहेर काढताना दिसत आहेत. (Accident News)

या लोकांच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि गाडीतील व्यक्तीचा जीव कसाबसा वाचतो. गाडीतील व्यक्ती बाहेर येता अडकलेली गाडी खोल दरीत कोसळते. जर व्यक्तीला गाडीतून बाहेर काढलं नसतं तर त्याचं काय झालं असतं याचा विचारही करवत नाही. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video: दोन वृद्धांमध्ये भररस्त्यात सिनेस्टाईल स्टाईल हाणामारी; कारण वाचून पोट धरून हसाल

ट्विटरवर @cctvidiots या हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3.5 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर जवळपास 12 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com