King Cobra Viral Video: माकडाचे माकडचाळे पाहून किंग कोब्रा थेट उभा राहिला; पुढे जे घडलं ते भयंकरच...

Monkey and King Cobra Viral Video: आपल्याशी पंगा घ्यायचा नाय, माकड आणि किंग कोब्रा यांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
Viral video
Viral videoSaam T

Animal Viral Video: माकड म्हणजे सगळ्यात खट्याळ प्राणी. माणसाला देखील रडू कोसळेल अशा या माकडाच्या अनेक करामती चर्चेत आहेत. माकडाचे आजवर बरेच व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. माकड अगदी जंगलाचा राजा असलेल्या वाघ किंवा चीता सोबत देखील पंगा घेतं. अशात आता या माकडाने प्रचंड विषारी असलेल्या किंग कोब्रा सोबत पंगा घेतला आहे. (Latest Viral Video)

सोशल मीडियावर सध्या माकड आणि किंग कोब्रा यांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये माकडाने किंग कोब्राला पार रडकुंडीला आणलं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की किंग कोब्रा आपला लांब आणि भलामोठा फणा काढून उभा आहे. त्याला पाहून माकडाने जराही भीती दाखवली नाही. उलट माकडाने त्याच्याशी खट्याळ मस्ती करायला सुरुवात केली आहे.

Viral video
Snake Eating Video: जिवंत साप तोंडात टाकून कचाकच चावला; फॅन्टासोबत साप खातानाचा VIDEO VIRAL

माकड या किंग कोब्राची शेपटी खेचत आहे. माकडाने हात लावताच किंग कोब्रा फना काढून उभा राहिला आहे. माकड जसा स्पर्श करतो तितक्यात किंग कोब्रा त्याला दंश करतो. त्याच्या दांशाने माकड जराही घाबरत नाही. पहिल्यांदा दंश केल्यावर माकड त्याला लगेच हुकवतो. तसेच नंतर पुन्हा एकदा किंग कोब्राची शेपटी खेचून त्याला दुसरीकडे खेचून आणतो.

@shnoyakam या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताच 66 लाखांहून अधिक व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर 2 लाखांहून अधिक लाइक्स या व्हिडिओला मिळाले आहेत.

Viral video
Train Viral Video: आई कुठे काय करते? प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमध्ये बाळाला ठेवलं सुरक्षित, डोळ्यांत टचकन पाणी येईल...

व्हिडीओ पाहून नेट कऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्या आहेत. काहींनी मकडासाठी काळजी व्यक्त केली आहे. तर काहींनी साप विषारी असतो हे माकडाला माहिती नाही असं म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com