Viral Video Stunt On Well: बाबो! जाम जोरात लागलं!; पठ्ठ्यानं थेट विहिरीवर घेतली कोलांटी उडी अन्..., कमरेचा खुळखूळा

Youngster Injured While Doing Stunt On Well: यामध्ये स्टंट करणं एका तरुणाला चांगलच महागात पडलंय.
Viral Video Stunt On Well
Viral Video Stunt On WellSaam TV

Viral Video: स्टंट करताना आपल्या शरीरावर आपला पूर्ण बॅलेन्स असावा लागतो. जरा जरी तोल गेला तरी कायमचं दुखणं मागे लागू शकतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये स्टंट करणं एका तरुणाला चांगलच महागात पडलंय. (Latest Stunt Viral Video)

सध्या उन्हाळा फार वाढला आहे. दुपारच्या वेळी तर जीवाची पार लाहीलाही होते. त्यामुळे अनेक मुलं आणि मुली गावच्या ठिकाणी विहिरीवर पोहण्यासाठी जात असतात. कडाक्याच्या उन्हात विहिरीवर पोहण्याची बातच और आहे. सध्या सोशल मीडियावर विहिरीमझध्ये पोहणाऱ्या काही मुलांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने विहिरीवर स्टंट बाजी करण्याचा प्रयत्न केलाय.

Viral Video Stunt On Well
Old Man Stunt Video: बाबा जरा दमानं! धावत्या दुचाकीवर आजोबांनी टणाटण मारल्या उड्या अन्...; VIDEO जोरदार VIRAL

व्हिडिओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, काही तरुण मंडळी विहिरीवर आली आहेत. ही भली मोठी विहीर पाण्याने पूर्ण भरली आहे. अशात काही तरुणांनी सरळ विहिरीत उडी मारली आहे. तर एक तरुण इथे उडी मारताना थेट विहिरीच्या कठड्यावर उभा राहून कोलांटीउडी मारतो. आता त्याची ही उडी थोडी फसते.

कोलांटी उडी फसल्याने तो विहिरीत पडण्याऐवजी तिथल्याच कठड्यावर जोरात आफटतो. यात या तरुणाच्या कंबरेला चांगलाच हदरा बसला आहे. व्हिडिओ पाहून सर्वच नेटकरी त्याची काळजी व्यक्त करत आहेत. तर काही जण त्याच्या या स्टंटवर हासत आहेत.

Viral Video Stunt On Well
Tiger - Deer Hunting Video: खरंच ना भावा! वाघाची शिकार हरणीने केली; सत्य घटनेचा VIDEO व्हायरल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com