School Girls Fight On Road: अरेरे.. बॉयफ्रेंडवरुन शाळकरी मुलींची भररस्त्यात 'दंगल', एकमेकींना धूधू धुतले

School Girl Viral Video: सध्या सोशल मीडियावर शाळकरी मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ (School Girls Fight Video) तुफान व्हायरल होत आहे.
School Girls Fight On Road
School Girls Fight On RoadSaam Tv

Social Media: सोशल मीडिया (Social Media) हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे एखाद्या गोष्टीची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ (Viral Video) एका झटक्यात व्हायरल होतात. आतापर्यंत सोशल मीडियावर तुम्ही तरुण आणि तरुणी, महिला आणि पुरुष यांच्या मारामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर शाळकरी मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ (School Girls Fight Video) तुफान व्हायरल होत आहे.

School Girls Fight On Road
Bride Rides On Car Bonnet: कारच्या बोनेटवर बसून नवरीचा स्वॅग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

या शाळकरी मुली शाळा सुटल्यानंतर भररस्त्यात एकमेकींना मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. या मुलींनी एकमेकींचे केस ओढत लाथा-बुक्यांनी मारहाण केली आहे. बॉयफ्रेंडवरुन या तीन मुलींमध्ये ही हाणामारी झाली असल्याचे कारण समोर आले आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स पोट धरुन हसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाळा सुटल्यानंतर गेटच्या बाहेर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे. शाळेच्या बाहेर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारच्या बाजूला काही विद्यार्थिनी उभ्या आहेत. यामधील एका विद्यार्थिनीने दुसऱ्या विद्यार्थिनीच्या केसाची वेणी पकडलेली दिसत आहे. सुरुवातीला या तिघी एकमेकींना काही तरी विचारताना दिसत आहे. त्यानंतर जे काही सुरु होते ते तर पाहण्यासारखेच आहे.

School Girls Fight On Road
Train Viral Video: आई कुठे काय करते? प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमध्ये बाळाला ठेवलं सुरक्षित, डोळ्यांत टचकन पाणी येईल...

या तिन्ही विद्यार्थिनी एकमेकींना मारहाण करु लागतात. केस ओढून लाथा-बुक्याने त्या एकमेकिंना मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या विद्यार्थिनींची भांडण पाहून आसपास उभे राहिलेले सर्व विद्यार्थी त्यांना हसताना दिसत आहेत. त्यानंतर दोन पुरुषांनी मध्ये घुसून या विद्यार्थिनींची भांडणं सोडवली. हे व्यक्ती भांडण सोडवत असताना सुद्धा त्या एकमेकींना मारहाण करतच असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. ज्या वाचून तुम्हालाही हसू येईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com