
Man Meri Jaan Kid Singing a Song Viral Video: सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडियावर नेहमी नवनवे व्हिडिओ, कलाकृती पाहायला मिळत असतात. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे अनेकजण रातोरात स्टारही झालेले आहेत. सध्या एका चिमुकल्याच्या आवाजानेही नेटकऱ्यांना अशी काही भुरळ घातली आहे की जिकडे तिकडे त्याचाच व्हिडिओ पाहायला मिळत आहे. काय आहे या चिमुकल्याच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य, जाणून घेवू.
लहान मुलांच्यात अशा काही कला असतात, ज्या पाहून भलेभले थक्क होतात. याआधी बसपण का प्यार वाला मुलगा असो किंवा लोकशाहीची व्याख्या सांगणारा भुऱ्या असो.. रातोरात या चिमुकल्यांनी सोशल मीडियावर लक्ष वेधत तुफान प्रसिद्धी मिळवली होती. सध्या अशाच एका मुलाच्या गोड आवाजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
या व्हायरल व्हिडिओमधील (Viral Video) मुलाने त्याच्या गोड आवाजात तु मान मेरी जान हे हिंदी गाणे गायले. शाळेत शिक्षकांच्या आग्रहाखातर त्या मुलाने हे गाणे गायला सुरूवात केली, ज्यामधील त्याच्या जादूई आवाजाने सर्वांनाच वेड लावले आहे. (Boy Singing a Song)
हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 24 लाख 46 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि 20.7 दशलक्षाहून अधिक म्हणजे सुमारे 2 कोटी 7 लाख युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देताना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणत हा मुलगा चांला गायक होईल असे म्हणले आहे. तर काही जणांनी हे झेडपीच्या शाळेतील टॅलेंट असल्याचे सांगत कौतुक केले आहे..
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.