
सोशल मीडिया (Social Media) हे एक असं व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक गोष्ट झटक्यात व्हायरल (Viral Video) होत असते. या ठिकाणी पडणारे फोटो आणि व्हिडीओ हे अवघ्या काही क्षणात व्हायरल होत असतात. लग्नाशीसंबंधित अनेक जबरदस्त व्हिडीओ (Wedding Funny Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असतात. या मधील काही व्हिडीओ खूपच फनी असतात. तर काही व्हिडीओ खूपच भावनिक असतात. पण काही व्हिडीओ असे असतात जे पाहून पोट धरून हसायला लावतात. असाच एक जबरदस्त व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. जो पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा हा लग्नातील व्हिडीओ नवरदेवाशी संबंधित आहे. हा नवरदेव आपल्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. नवरदेव लग्नासाठी तयार होतो आणि थोड्याच वेळात त्याची वरात निघणार असते. वरातीसाठी नवरदेव घराच्या बाहेर पडत नाही तोवर मुसळधार पावसाला सुरुवात होते. हा पाऊस इतका मुसळधार होता की पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. अशामध्ये लग्नासाठी आलेले पाहुण्यांनी घरामध्येच थांबणे योग्य होते.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. असे असताना देखील नवरदेवाने आणि लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनी हार मानली नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्न करून नवरीला घरी आणणार असा पण नवरदेव करतो. शेवटी नवरदेव आणि त्याचे पाहुणे लग्नाच्या हॉलपर्यंत कसे तरी पोहचतात. तर हॉलच्या ठिकाणी खूप पाणी साचलेले असते. तर नवरदेवाचे पाहुणे त्याला उचलून घेतात आणि हॉलपर्यंत आणतात. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सला देखील हसू आवरता येत नाहीये.
मुसळधार पाऊस, पूर असताना देखील नवरदेवाने शेवटपर्यंत प्रयत्न करत लग्न करून नवरीला घरी आणले. नवरदेवाचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. इन्स्टाग्रामवर dramebaazchhori99 नावाच्या हँडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.