Amchya Pappane Ganpati Aanla: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला..' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Who Is Reel Star Sairaj Kendre: वाचा कोण आहे सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा साईराज
Amchya Pappane Ganpati Aanla
Amchya Pappane Ganpati AanlaSaam tv

Who Is Amchya Pappane Ganpati Aanla Fame Sairaj Kendre:

आमच्या पप्पांनी गणपती आणला..या गाण्याने अक्षरशा महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. गाण्यातील बोबडे बोल, चिमुकल्याचे गोड हावभाव सगळ्यांच्याच मनात घर करत आहेत. सोशल मीडियावर आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं प्रचंड ट्रेंड होत आहे. सगळीकडे या गोंडस मुलाची आणि त्याच्या हावाभावाची जोरदार चर्चा होत आहे. मात्र या व्हिडीओतील चिमुकला आहे तरी कोण? त्याचं नाव काय? तो कुठे राहतो..? जाणून घ्या.

Amchya Pappane Ganpati Aanla
Virat Kohli Dance Video: विराटचा पहाडी अंदाज! नेपाळी गाणं वाजताच केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

येत्या काही दिवसात गणपतीचं आगमन होणार आहे. त्याआधीच सोशल मीडियावर'आमच्या पप्पांनी गणपती आणला' हे गाणं चांगलंच व्हायरल झालंय. यामध्ये एक गोंडस मुलगा शाळेच्या गणवेशात गणपतीचं गाणं म्हणताना दिसतोय. या गाण्याला नेटकऱ्यांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.

गणेश केंद्रे या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या चिमुकल्याचे नाव साईराज केंद्रे असं आहे . साईराज अवघ्या ४ वर्षांचा आहे. तो बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडी गावात राहतो. सध्या तो साईराज अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षण घेतोय.

साईराजचे वडील गणेश केंद्रे , हे साईराजचे अनेक व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर पोस्ट करत असतात. साईराजच्या या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलंय. तसंच साईराजच्या हावभावाचे विशेष कौतुक होतंय. दिग्गज नेत्यांनी देखील साईच्या वडिलांना संपर्क करून साईचं कौतुक केलंय. नुकताच धनंजय मुंडे यांनी साईराजची भेट घेतल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. (Latest VIRAL videos)

साईराज दीड वर्षांचा असल्यापासून टीकटॉकवर व्हिडीओ करतो. टीकटॉक हद्दपार झाल्यावर गणेशच्या वडिलांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकण्यास सुरूवात केली. या आधी देखील साईराजचा मला पावसात खेळूदे हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं पाहून साईराजने त्यावर रिल करण्याचा हट्ट केला आणि दोन दिवसात वडिलांनी हा व्हिडीओ शूट करून पोस्ट केला. आणि त्यानंतर हा व्हिडीओ महाराष्ट्रातील जनतेच्या थेट मनापर्यंत पोहचलाय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com