Bath On Bike VIRAL VIDEO: कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी तरूण-तरुणीचा देसी जुगाड, धावत्या दुचाकीवर केली अंघोळ

Boy and Girl Bath On Bike Viral Video: या तरुण-तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv

Ulhasnagar News: मुंबईसोबतच (Mumbai)राज्यातील जनता उकाड्यामुळे प्रचंड हैराण झाली आहे. उकाड्यातून सुटका होण्यासाठी अनेक उपाय शोधून काढले जात आहेत. अशातच उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) राहणाऱ्या एका तरुणाने या उकाड्यावर अनेक गमतीशीर व्हिडिओ तयार केले आहेत. त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.

Viral Video
Pune News: पुण्यात फेरीवाल्यांची मुजोरी, अतिक्रमण कारवाईदरम्यान सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण, Video व्हायरल

मुंबईला लागून असलेल्या उल्हासनगर, अंबरनाथ शहरांमध्ये सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. याठिकाणी तापमान चाळीशीच्या पार गेले आहे. वाढत्या तापमानामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अशामध्ये या उकाड्यातून सुटका करण्यासाठी एका तरुण-तरुणीने देसी जुगाड केला आहे. त्यांनी भररस्त्यात गाडी चालताना अंघोळ केली आहे. या तरुण-तरुणीचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आदर्श शुक्ला या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक तरुण आणि तरुणी उल्हासनगरच्या रस्त्यावर पाण्याने भरलेली बादली आणि मग घेऊन स्कूटरवर फिरताना दिसत आहे. यामध्ये स्कूटरवर पाठीमागे बसलेली तरुणी चक्क चालत्या गाडीवर तरुणाच्या आणि स्वतःच्या अंगावर पाणी ओतून घेताना दिसत आहे. वाढत्या उकाड्यातून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत.

Viral Video
Shocking Video: अरे बापरे! वादळी वारा आला अन् हत्तीच हवेत उडाला; VIDEO पाहून चक्रावून जाल

दुसऱ्या एका व्हिडिओत हाच तरुण गाडीच्या सीटवर बर्फाची लादी ठेवून त्यावर बसून गाडी चालवताना दिसत आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसात गाडीची सीट प्रचंड तापलेली असते. त्यामुळं अनेकदा चालकांना चटके सोसावे लागतात. त्यावर त्याने हा उपाय शोधून काढला आहे. तर तिसऱ्या एका व्हिडिओत हाच तरुण गाडी धुवायला गेल्यावर गाडीसोबतच स्वतःवर देखील पाणी मारून घेतोय आणि गर्मीपासून वाचण्याचा प्रयत्न करतोय, असे दाखवण्यात आले आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असुन नेटिझन्स त्यावर जबरदस्त कमेंट्स करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com