माजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाखमोलाची मदत

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 20 मे 2021

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, भारताची माजी महिला क्रिकेटर के एस श्रावंती नायडूला तिच्या संकट काळात धावून आला आहे. 

मुंबई :  भारताची India माजी महिला क्रिकेटर के एस श्रावंती नायडूला K. S. Shravanti Naidu भारतीय क्रिकेट Cricket संघाचा कर्णधार विराट कोहलीने Virat Kohli मदतीचा हात दिला आहे. कोहलीने तिच्या आईच्या उपचारासाठी तब्बल 6 लाख 77 हजार रुपयांची मदत केली आहे. के. एस. श्रावंतीच्या आई सध्या रुग्णालयात Hospital उपचार घेत आहेत. मात्र तिच्याकडे यासाठी पुरेसे पैसे नाहीत. श्रावंतीच्या आईची प्रकृती सद्द्य गंभीर आहे. अशावेळी विराटने श्रावंतीला मदत देऊ केली आहे. Virat Kohli financial help to Former Indian Women Cricketer K S Sravanthi Naidu

आई वडिलांच्या उपचारासाठी के एस श्रावंतीने आतापर्यंत 16 लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु अजूनही तिच्या आई बाबांना Mother-Father बरं वाटत नाही आहे.

हे देखील पहा -

श्रावंतीने बीसीसीआय BCCI आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडे Hyderabad Cricket Association याबद्दल काही मदत सुद्धा मागितली होती. ज्यानंतर बीसीसीआय साऊथ झोनचे माजी संयोजक एन विद्या यादव N Vidya Yadav यांनी यासंबंधी ट्विट करुन श्रावंतीला मदतीचं आवाहन केलं होतं, ज्यामध्ये विराट कोहलीला देखील त्यांनी टॅग केले होते.

"तु मेरी जोहरा जबी.. म्हणत ऑक्सिजन लावलेल्या कोविड रुग्णांनी टाळ्यांच्या लयीत धरला ताल 

श्रावंतीच्या आई वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल विराटला ट्विटच्या माध्यमातून कळाले. पण जेव्हा विराटच्या कानावर हा प्रसंग आला त्याने लगोलग मदत करण्याचे ठरवले. विराटने श्रावंतीला 6 लाख 77 हजारांची रक्कम दिली आहे. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक Fielding Instructor आर श्रीधर R Shridhar यांनीही श्रावंतीच्या आईसाठी पैसे जमा केले होते.

Edited By- Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live