सांगली-मिरजेतील रुग्णालयांचे २४ तासात फायर ऑडीट करा...

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

नाशिक आणि विरारमधील हॉस्पिटलमधील मृत्यूच्या तांडवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांच्या फायर ऑडीट पुढील २४ तासात करा असे आदेश राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी व आयुक्त नितिन कापडणीस यांना दिले. मंत्री कदम यांनी आज पहाटे विरारमधील घटना समजताच तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला

सांगली : नाशिक Nashik आणि विरारमधील Virar हॉस्पिटलमधील मृत्यूच्या तांडवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांच्या फायर ऑडीट पुढील २४ तासात करा असे आदेश राज्यमंत्री विश्‍वजीत कदम Vishwajeet Kadam यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी व आयुक्त नितिन कापडणीस यांना दिले. Vishwajeet Kadam Orders Urgent Fire Audit of Sangli Miraj Hospitals

मंत्री कदम यांनी आज पहाटे विरारमधील घटना समजताच तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. महापालिका क्षेत्रातील सर्व कोविड रुग्णालयांचे प्राधान्याने ऑडीट Fire Audit करा असे त्यांनी सांगितले. 

२३/०४/२०२१ रोजी रात्री ०३:१३ वाजताच्या सुमारास तिरुपती नगर, बंजारा हॉटेलच्या मागे, विरार(प.) येथे विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये(तळ+४) दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आग Fire लागली होती सदर घटनास्थळी विरार अग्निशमन दलाचे ०३-फायर वाहन उपस्थित होते. सदरची आग अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ०५:२० वा. सुमारास विझवली.  सदर घटनेत १४ रुग्णांचा मृत्यू झालेला असून ५ ते ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांतल्या रुग्णालयांच्या फायर आॅडिटची आवश्यकता समोर आली आहे. Vishwajeet Kadam Orders Urgent Fire Audit of Sangli Miraj Hospitals

याबाबत श्री कदम म्हणाले, "नाशिकमधील ऑक्‍सिजन गळती आणि विरारमधील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील एसीतील बिघाडामुळे लागलेली आग दुर्दैवी घटना आहेत. आरोग्य यंत्रणावर ताण आहे मात्र अशा घटना टाळल्याच पाहिजेत. त्यातून धडा घेत सर्वच यंत्रणांनी आपल्यातील त्रुटी दूर करून स्वतःला सज्ज केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी Chief Minister या दोन्ही घटनांच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. आज मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सांगली-मिरजेतील रुग्णालयांची माहिती घेतली. तेथील फायर ऑडीट करावे. पुढील २४ तासात त्याचा अहवाल द्यावा असे आदेश दिले आहेत.''
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live