रुग्णांच्या मदतीला धावला विठुराया...मंदिर समिती सुरु करणार २०० बेडचे कोविड रूग्णालय

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वेदांत आणि विडीओकाॅन या दोन भक्त निवासस्थानातील २०० खोल्या आणि बेड कोरोना रूग्णासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे

पंढरपूर : पंढरपूर Pandharpur व ग्रामीण परिसरातील कोरोना Corona रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत. यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वेदांत आणि विडीओकाॅन या दोन भक्त निवासस्थानातील २०० खोल्या आणि बेड Bed कोरोना रूग्णासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. The Vitthal Temple Committee will start a 200 bed Covid Hospital

या संदर्भात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून पंढरपूर व परिसरात कोरोना रूग्णांची संख्या चिंताजनक झाली आहे. सध्या सुमारे १ हजाराहून अधिक रुग्णांवर शहरातील दोन शासकीय व आठ खासगी हाॅस्पीटलमध्ये Hospital  उपचार सुरु आहेत.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येमुळे रुग्णांला बेड आणि उपचार मिळणे अवघड झाले आहे. अशातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर Milind Shambharkar हे उद्या दोन्ही भक्तनिवास्थानाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर येथे आवश्यक त्या वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. The Vitthal Temple Committee will start a 200 bed Covid Hospital

मंदिर समितीच्या या निर्णयामुळे गरजू आणि गरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षभरापासून विठ्ठल रुक्मिणी मंदि बंद आहे. तरी ही मंदिर समितीने कोरोना काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. 

Edited By- Digambar Jadhav

 

संबंधित बातम्या

Saam TV Live