संध्याकाळी सात नंतरदेखील मतदान प्रक्रिया सुरु 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

विधानसभा 2019 : संपूर्ण राज्यभरात सोमवारी (ता.21) विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. काही ठिकाणी वरुणराजाने हजेरी लावल्याने सकाळी मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. मात्र, काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारनंतर मतदारांनी मतदान करण्यासाठी बूथवर हजेरी लावली. 

माण विधानसभा मतदार संघाच्या म्हसवड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमधील मतदान केंद्र क्रमांक 133, 134 आणि 135 या केंद्रांवर सायंकाळच्या सुमारास मतदारांनी गर्दी केली. परिणामी, सायंकाळच्या सात वाजून गेल्यानंतरही या केंद्रात मतदान प्रक्रिया सुरू राहिली.

मावळ तालुक्यातील वराळे मतदान केंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाल्याने कर्मचाऱ्यांनी मेणबत्तीच्या उजेडात कामकाज पार पाडले. मात्र, त्या मतदान केंद्रावर स्वच्छतागृह, पाणी आणि मच्छरांचा सामना या निवडणूक अधिकाऱ्यांना करावा लागला.

बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथेही रात्रीच्या साडे सातनंतर मतदान सुरुच होते. या मतदान केंद्रावर सायंकाळी साडे पाचनंतर मतदारांनी रांगा लावल्यामुळे मतदानाचे काम उशिरापर्यंत सुरुच राहिले.

विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या सिंदी रेल्वे येथील मतदान केंद्रावर मतदार उशिरापर्यंत रांगेत उभे राहिले होते. पुणे जिल्ह्यातही  काही मतदान केंद्रावर रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी हाती येण्यास उशीर लागला.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील मतदारांनी दिवसभर शेतीतील कामे केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मतदान केंद्राकडे धाव घेतली. त्यामुळे दिवसभर संथपणे सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला उत्तरार्धात वेग आला. त्यामुळे निवडणूक अधिकारी आणि प्रशासनाची धावपळ उडाली.

काही ठिकाणी किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रिया रेंगाळली. या गोष्टी वगळता ग्रामीण भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. 

Web Title: Voters standing on election booth at late night for Vidhan Sabha 2019 election
 
संबंधित बातम्या

Saam TV Live