दगडाला देव बनवणाऱ्या हाताला दोन घासाची प्रतीक्षा

Artisan
Artisan

बीड - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने Corona Second Wave हाहकर माजवला आहे. लॉकडाऊनमुळे Lockdown अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच अनेकांचे व्यवसाय Business बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांना Citizen अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. अनेक कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने, अनेक कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकंती करत आहे . कधी या जिल्ह्यात, तर कधी त्या जिल्ह्यात, एवढंच नाही तर अनेक कुटुंब कधी-कधी परराज्याची वाट  देखील धरत आहे.  परंतु लॉकडाऊनमुळं Lockdown  अशा कुटुंबापुढे  अनेक समस्या निर्माण झाल्यात आहे. बीडमध्ये दगडावर Stone  घाव घालत देव बनवणाऱ्या हाताला दोन घासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. ( Waiting for two hands on the hand that makes the stone a god)

हे देखील पहा - 

मध्यप्रदेशमधील चव्हाण कुटुंब घरातील परिस्थिती हलाखीची आहे.  हे कुटुंब वणवण भटकंती करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात.ज्या शहरात हे कुटुंब गेलंय, त्या ठिकाणी रस्त्याच्याकडेला एखादी कोप करायची अन त्या कोपीतचं वर्षानुवर्षे रहात हे आपलं कुटुंब चालवत.  या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय हा दगडापासून  मूर्ती  बनवण्याचा आहे. विविध देवांच्या अतिशय सुंदर मुर्त्या , उकळी, खलबते यासह अनेक वस्तू ते बनवतात. मात्र कोरोनाच्या संकटांना लॉकडाऊन लागलं आणि याच लॉकडाऊनचा फटका या कुटुंबाला देखील बसला. मूर्तिकार असणाऱ्या चुंनीलाल चौहान यांनी मारोती, महादेव, नंदी, गणपती, कृष्ण, विठ्ठल रुक्मांई, भवानीमाता यासह अनेक देवांच्या मुर्त्या आणि  विविध वापरात येणाऱ्या वस्तू बनवल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मुर्त्या बनवल्या असताना देखील, लॉकडाऊनमुळं ग्राहक नसल्याने, मुर्त्या धूळखात पडून आहेत. यामुळे दिवसाला एखादी उकळी विकली तर या कुटुंबाला दोन घास मिळतात.अन्यथा दोन घासासाठी या कुटुंबाला ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

चुंनीलाल यांचा मुलगा मोहन चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार,  आता खायचं वांदे आहेत. त्यात जागेचं भाड द्यावं लागत आहे.  आज धंदापाणी नाही, त्यामुळे वस्तू बनवून ठेवणं सध्या सुरू आहे. एखादं ग्राहक आलं तर पाच पन्नास रुपये मिळतात. त्यावरच सध्या गुजरान सुरू आहे. सध्या मूर्तीची एकही ऑर्डर नाही दुकानात सामान पूर्ण बनवून ठेवलंय. मात्र आज ग्राहक नसल्याने खायचे हाल झाले आहेत. 


मोहनची पत्नी राणी चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे , सध्या गिऱ्हाईक नाही. शंभर दोनशे रुपये मिळतात, त्यात जागेचा भाडं, लाईट बिल द्यावे लागते. एवढेच नाही तर पिण्याचे पाणी देखील विकत घ्यावे लागते. खूप अडचणी आहेत. पावसामुळे घर गळतय, घरात गॅस नाही, चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय. पहिलं तीन वेळा जेवण करायचो. मात्र आता एक किंवा दोन वेळा जेवण करतोय. त्यातही फक्त तांदूळ खाण्याची वेळ आली आहे. आजारी पडलं तर दवाखान्यात  जायला पैसे नाहीत, मेडिकल वरून गोळी आणून खावी लागते. आज खूप अडचणी समोर आहेत.

दरम्यान लॉकडॉऊनमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण  झालं असताना, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वणवण भटकंती करून व्यवसाय करणाऱ्यांवर, उपासमारीची वेळ आली आहे. 

Edited By - Puja Bonkile 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com