लवकरच पालिकेची झोपडपट्टीमुक्‍तीकडे वाटचाल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

 

पनवेल : पनवेल महानगरपालिका मंगळवारी (ता.१) तीन वर्षांची होत आहे. पनवेलचा विकास करण्याकरिता महापालिका अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षात परिसराचा फारसा विकास झाला नाही. तर घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे सुशोभीकरण, झोपडपट्टीमुक्‍तीचा प्रयत्न, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत ५ गावांतील विकासकामे सुरु करण्यात पालिकेला यश आले आहे.

 

पनवेल : पनवेल महानगरपालिका मंगळवारी (ता.१) तीन वर्षांची होत आहे. पनवेलचा विकास करण्याकरिता महापालिका अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षात परिसराचा फारसा विकास झाला नाही. तर घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे सुशोभीकरण, झोपडपट्टीमुक्‍तीचा प्रयत्न, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत ५ गावांतील विकासकामे सुरु करण्यात पालिकेला यश आले आहे.

सध्या तालुक्‍यातील प्रदूषण, पाणीपुरवठा, आरोग्य यंत्रणा; तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत ३ वर्षे उलटून गेली असली तरी येत्या काळात यावर पालिका उपाययोजना करील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पनवेल शहरातील झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. शासनाकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला असल्याचे पालिका आयुक्तांकडून सांगण्यात आले. परंतु पुढे याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत प्रशासनाला फारसे यश मिळाले नाही.
सद्यस्थितीत पालिका हद्दीतील दुरवस्था झालेले रस्ते, अपुरी आरोग्य यंत्रणा, पाणीपुरवठ्याचा उडालेला बोजवारा, गंभीर स्वरूप प्राप्त केलेला प्रदूषणाचा मुद्दा, सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेकरिता असलेल्या अपुऱ्या सोई-सुविधा; तसेच शहरी भागात नियमित निर्माण होणारी वाहतूक कोंडी यामुळे सर्वसामान्य पनवेलकर अद्यापही असमाधानी आहेत. विकास आराखड्याअभावी रखडलेल्या नोकरभर्तीचा परिणामदेखील   परिसरातील विकासकामांवर होत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहकार्याने प्रशासनाचे काम योग्य रीतीने सुरू आहे. आकृतिबंध तयार झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामांमध्ये काही अडचणी येत आहेत. 
- गणेश देशमुख, आयुक्त, पालिका

पालिका स्थापनेचा सुरुवातीचा एक ते दीड वर्षाचा कार्यकाळ सोडल्यास प्रशासनाचे कामकाज योग्य दिशेने सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्या हेतूने पनवेल पालिकेची स्थापना व्हावी, याकरिता पुढाकार घेतला तो हेतू साध्य होताना दिसत आहे.
- परेश ठाकूर, सभागृहनेते, भाजप

पालिकेकडून सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमधून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. पालिकेला आरोग्य यंत्रणा योग्यरीतीने राबवण्यात यश आले आहे.
- डॉ. कविता चौतमोल, महापौर

 

Web Title: Walk to the slums of the municipality


संबंधित बातम्या

Saam TV Live