अभ्यासाच्या गावात भिंतीच बनल्या फळे

school
school

भोर -  बातमी आहे अशा एका गावची की त्या गावाला अभ्यासाचे Study गाव म्हणून ओळखले जात आहे. या अनोख्या गावात सगळेच चालता बोलता अभ्यास करतात. कोरोनामुळे Coronaशाळा Schoolबंद झाल्या मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास बंद होऊ नये म्हणून अख्खा गावच अभ्यासाच गाव झालं आहे. पुणे Pune जिल्ह्यातील भोर Bhor तालुक्यातील हे गाव आहे. या गावात कोरोनाच्या संकटामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यात इंटरनेट Internet सेवा नीट नसल्याने ऑनलाइन Online Study शिक्षण किंवा अभ्यास क्रम पूर्ण करता येत नव्हता. त्यात शाळा बंद असल्याने मुले अभ्यास ही करत नव्हती. walls became the study borad in village 

यावर उपाय म्हणून ग्रामस्थ, शिक्षक आणि गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावातील घरांवर अभ्यास क्रम लिहिण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. मराठी ,इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित आशा सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम घरांच्या भिंतीवर रेखाटला जात आहे. गावातील तरुणच हे काम करीत आहेत. राजेश बोडकेच्या संकल्पनेतून हे गाव तयार होत आहे. यापुढे भिंतीवर शेतीविषयक माहिती असणार आहे.

हे देखील पहा -

भोर पासून 7 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. कोरोना काळात बरेच मुलं ऑनलाइन शिक्षण घेत होते मात्र त्यांना ते संमजत नव्हतं मुलांना सांगितलं तर ते अभ्यास न करता खेळायचे. आता घराच्या दारात बसून मूल अभ्यास करताना दिसतात अगदी हसत खेळत प्रत्येक विषयांचा अभ्यास करतात. या बोलक्या भिंतीमुळे पुन्हा मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होताना दिसत आहे. आता मुलांना पाढे पाठ झालेत अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. आता अभ्यास केलेल आमच्या लक्षात राहत आहे अस मुलं सांगतात. walls became the study borad in village 

एवढ़च नाही तर या अभ्यासांच्या बोलक्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांबरोबर गावकऱ्यांची ही उजळणी होती आहे. ग्रामस्थ ही जाता येता आवडीने या भिंतींवरील माहिती वर नजर टाकतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.  कोरोनाच्या काळात काहीसा बदल, आनंद आणि सकारात्मक विचार या निमित्ताने गावात निर्माण झाला आहे. त्या मुलांचा अभ्यास उजळणी ही सहजपणे होत आहे. त्यामुळे या म्हाळवडी अभ्यासाच्या गावचे वेगळेपणा अधोरेखित नक्कीच होत आहे.

लॉकडाऊन मध्ये बंद असणाऱ्या शाळा आणि त्यामुळे होणारं नुकसान हा आता काळजीचा मुद्दा ठरला आहे. त्यातच जिथे नेटवर्क आहे तिथे किमान ऑनलाईन अभ्यास तरी सुरू आहे. पण ग्रामीण भागात जिथे नेटवर्क नाही आणि शाळाही बंद तिथे नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. याच प्रश्नावर उत्तर शोधलं आहे या तरुणांनी त्यांनी अख्ख्या गावाचीच शाळा बनवली. 

मुलं शाळेत जात नसल्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे हे दिसत होतं. पण यावर पर्याय काय हे सुचत नव्हतं.मग विचार केला की शाळेतल्या भिंतींसारखे जर घरांच्या भिंतींवर धडे लिहिले तर? गावातल्या सगळ्या लोकांनीच ही संकल्पना उचलून धरली. मग शिक्षकांशी चर्चा झाली आणि मग काय काय रंगवायचं ते ठरवलं.  walls became the study borad in village 

या सगळ्याला येणार लाख दीड लाखांचा खर्च देखील बोडके बोडखेनी उचलला. आणि मग घरांच्या भिंती रंगल्या विज्ञान, गणित, इतिहास भुगोलापासून ते अगदी फोनेटिक्स पर्यंत अनेक धडे भिंतींवर रंगले आहेत. गावातल्या जवळपास 85 घरांच्या भिंती आता या रंगात रंगल्या आहेत. शिक्षकांना सुद्धा या प्रकल्पाचा खूप फायदा झाला आहे.

इथे गावात नेटवर्क ची अडचण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला अडचण येत होती.आम्ही मुलांकडे जायचो पण त्यात दिवसाला पाच ते सहा मुलं कव्हर व्हायची. त्यामुळे जेव्हा ही संकल्पना पुढे आली तेव्हा पाढे, काही धडे, असा सगळं रंगवून घेतलं. बेस तयार असेल तर पुढचा अभ्यास करणं सोपं जाईल हा यामागचा हेतू होता. या बरोबरच आम्ही अभ्यास मित्र तयार केले आहेत. म्हणजे मोठी मुलं लहान मुलांना शिकवतात. या चित्र आणि अभ्यासमित्रांच्या माध्यमातून मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. walls became the study borad in village 

एक अभ्यासाचं गाव तर तयार झालंय. पण आता आजूबाजूचा गावांमध्ये ही हा प्रकल्प राबवाला तर नक्की ऑनलाइन शिक्षणाला ऑफलाईन पर्याय होऊ शकतो.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com