आषाढी पायी पालखी सोहळ्यावर वारकरी ठाम...!

भारत नागणे
बुधवार, 26 मे 2021

 सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जाणारा  आषाढी पायी पालखी सोहळा तोंडावर आला आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पायी पालखी सोहळा निघणार की गतवर्षी प्रमाणे संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात आणल्या जाणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर - सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जाणारा आषाढी पायी पालखी सोहळा Ashadi Palkhi ceremony तोंडावर आला आहे. परंतु कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पायी पालखी सोहळा निघणार की गतवर्षी प्रमाणे संतांच्या पादुका एसटी ST बसने Bus पंढरपुरात Pandharpur आणल्या जाणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा पायी पंढरपूरकडे नेला जाईल अशी ठाम भूमिका  वारकरी व महाराज मंडळींनी घेतली आहे. आषाढी पालखी सोहळ्या बाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray व उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी शुक्रवारी  मुंबईत  महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे महाराष्ट्रातील वारकरी आणि महाराज मंडळींचे लक्ष लागले आहे. Warakari insists on Ashadi Palkhi ceremony

कोरोना महामारीमुळे गतवर्षी आषाढी पायी पालखी सोहळा रद्द  करुन  मानाच्या सात  संंतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात आणल्या होत्या. त्यानंतर मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत आषाढी सोहळा साजरा केला होता. यावर्षी आषाढी पालखी सोहळा मोठ्या थाटामाठात निघेल अशी वारकर्यांना आशा होती. परंतु जानेवारी पासून पुन्हा राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेत मोठी जीवित हानी झाली आहे.

हे देखील पहा -

अजूनही कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे.अशातच आषाढी पायी पालखी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. यावर्षी 1 जुलै रोजी संत तुकाराम आणि 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे  प्रस्थान होणार आहे.  परंतु वाढत्या कोरोना संसर्गामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. त्यामुळे यंदा ही आषाढी पालखी सोहळ्यावर  कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.

अशातच वारकरी व महाराज मंडळींनी यंदाचा आषाढी पालखी सोहळा पायी पंढरपूरकडे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासंदर्भात संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि  पालखी सोहळा प्रमुखाची व्हीडीओ काॅन्फर्न्सद्वारे एक बैठक झाली. त्यामध्ये सर्वच महाराज मंडळींनी पायी पालखी सोहळा काढावा अशी एकमुखी मागणी केली. त्यामुळे पायी पालखी सोहळ्यावरुन वारकरी विरुध्द सरकार अशा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Warakari insists on Ashadi Palkhi ceremony

दिलासादायक ! मुंबईत तब्बल एका महिन्यात दीड लाख रुग्ण कोरोनामुक्त....

वारकऱ्यांचे लसीकरण करावे. आषाढी पायी पालखी सोहळा तोंडावर आला आहे. कोरोनाचे सर्वनियम पाळून पायी पालखी सोहळ्यास राज्य सरकारने  परवानगी द्यावी. गतवर्षी वारकर्यांनी राज्य शासनाला सहकार्य केले होते. यावर्षी राज्य शासनाने वारकर्यांना सहकार्य करावे. मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत पायी पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सरकारने वारकर्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे,अशी मागणी नामदेव महाराज लबडे यांनी केली आहे. Warakari insists on Ashadi Palkhi ceremony

यंदाचा आषाढी पायी पालखी सोहळा एक महिन्यावर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर सोहळ्या बाबत चर्चा सुरु झाली  आहे. गतवर्षी आषाढी पायी पालखी सोहळा रद्द केला होता. याचं  वारकर्यांना आजही मोठ दुःख आहे. यंदातरी राज्य सरकारने पायी पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी. अनलाॅकमध्ये सरकार सर्वांचा विचार करणार असेल तर यामध्ये वारकरी आणि वारकरी संप्रदायाचाही  विचार करावा. यावर्षी पायी पालखी सोहळा काढण्यावर वारकरी व महाराज मंडळी ठाम आहोत.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live