वर्ध्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने फळबागा उध्वस्त

सुरेंद्र रामटेके
शुक्रवार, 14 मे 2021

वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने घरांचे,  केळी, पपई व इतर पिकाचे मोठे नुकसान केले आहे. खासदार रामदास तडस यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेत पंचनामे केले आहेत. तसेच प्रशासकीय यंत्रणेने त्वरित सर्वे करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

वर्धा : वर्ध्यामध्ये Wardha  वादळी वाऱ्याने Stormy winds व अवकाळी पावसाने Rain घरांचे, केळी, पपई व इतर पिकाचे मोठे नुकसान
Crop Damage केले आहे. खासदार रामदास तडस Ramdas Tadas यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची Farmer व्यथा लक्षात घेत पंचनामे केले आहेत. तसेच प्रशासकीय यंत्रणेने त्वरित सर्वे करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

पवनार गावातील तसेच वर्धा तालुक्यातील ज्या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी त्यांच्यासह तहसीलदार व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

हे देखील पहा -

आधीच कोरोनामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. परिस्थिती अत्यंत गंभीर असताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून सावरावे लागत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असताना अशातच जिल्ह्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पवनार गावाला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तब्बल अर्धा तास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरांचे, शेत शिवारातील भाजीपाला, केळी बागायतदार व पपई बागायतदारांच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मोठ्या प्रमाणात बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना नैराश्य आले आहे. अचानक झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्ग कोपला तर शेतकरी झोपला अशी परिस्थिती आज झाली आहे. विशेषतः तरुण शेतकरी आज देशोधडीला लागला आहे. शासनाने त्यांना मदत करायला पाहिजे केंद्र शासनाच्या पीक विमा योजनेतून कशी मदत करता येईल यासाठी पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे असे खासदार तडस म्हणाले.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा दक्षतेचा इशारा

वादळी पावसाने वर्धा तालुक्यातील पवनार परिसरातील महाकाळ, तामसवाडा,येसंबा परिसरात चांगलेच नुकसान केले. भाजीपाल्यासह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या काळात जवळपास शंभर घरांची पडझड झाली असून अनेकांच्या घरावरचे छप्पर उडाले, अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतची अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. एका शेतकऱ्याचे घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. तहसीलदार बीडीओ व कृषी विभागाच्या मार्फत संयुक्त पंचनामा करून शासनास अहवाल सादर केला जात आहे. 

Edited By : Krushna Sathe


संबंधित बातम्या

Saam TV Live