आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात वारकऱ्यांची पोलिसात तक्रार..(व्हिडिओ)

जयेश गावंडे
शुक्रवार, 14 मे 2021

छापून येताच वारकाऱ्यांकडून Warkari यावर तीव्र आक्षेप नोंदवला जात आहे.  वारकरी सेनेच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अकोट येथील ग्रामीण पोलीस स्टेशन, व तहसील कार्यालय येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अकोला : बुलडाण्याचे Buldana आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी ही उपवास- तपासाची वेळ नाही, कोरोना Corona काळात देवही वाचवायला येत नाही, असे केलेल वक्तव्य एका स्थानिक वृत्तपत्रात छापून येताच वारकाऱ्यांकडून Warkari यावर तीव्र आक्षेप नोंदवला जात आहे.  वारकरी सेनेच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अकोट येथील ग्रामीण पोलीस स्टेशन, व तहसील कार्यालय येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. Warkari Association files Complaint Against Shivsena MLA Sanjay Gaikwad

आमदार गायकवाड यांनी उपवास-तपास Fasting करू नका मांसाहार करा Non Veg आणि कोरोना काळामध्ये देवाने दरवाजे बंद केले आहेत देवही तुमच्या मदतीला येणार नाही, असे वक्तव्य केल्याचीलबातमी एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये News Paper मध्ये आली होती. त्यामुळे राज्यातले वारकरी संतापले आहेत.  ''आमदार संजय गायकवाड यांच्या बोलण्याचा सरळ अर्थ हा निघतो युगा युगाचा शाकाहारी असणारा हिंदू सनातन धर्म मासाहाराच्याकडे वळावा. कोरोना मुळे तुमचा जीव वाचवण्याची भीती दाखवून आमदार संजय गायकवाड हे मांसाहाराकडे वळवण्याचा गोंडस प्रयत्न करत आहेत,'' असा आरोप वारकरी सेनेने केला आहे.

म्यूकरमायकोसिस उपचारांसाठी ठाण्याचे रुग्णालय सज्ज

अनेक वारकऱ्यांकडून आमदार जाधव यांना फोन करून आपल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान  संजय गायकवाड यांच्या विरोधात त्वरित गुन्हा दाखल न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. याची दखल प्रशासनाने तात्काळ घेण्याची मागणी करण्यात आली आहे.  Warkari Association files Complaint Against Shivsena MLA Sanjay Gaikwad

आतापर्यंत शिवसेनेच्या एकाही आमदाराने संजय गायकवाड यांच्या बाजूने प्रतिक्रिया न दिल्याबद्दल शिवसेनेचे  वारकऱ्यांच्या तर्फे धन्यवाद मानण्यात आले. वारकऱ्यांना आई बहिणीवर शिवीगाळ करणे योग्य नाही वारकऱ्यांची माफी मागायला पाहिजे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live