आमदार संजय गायकवाडांच्या 'त्या' वक्तव्यावर वारकरी चिडले

MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay Gaikwad

बुलडाणा : बुलडाणा Buldana मतदार संघातील आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये बेताल असं वक्तव्य केला असल्याचा आरोप विश्व वारकरी सेनेचे संस्थापक गणेश महाराज शेटे यांनी केला आहे.  Warkaris Angry over Shivsena MLA Sanjay Gaikwad Statement about Non Veg

आमदार गायकवाड यांनी उपवास-तपास Fasting करू नका मांसाहार करा Non Veg आणि कोरोना काळामध्ये देवाने दरवाजे बंद केले आहेत देवही तुमच्या मदतीला येणार नाही, अशा आशयाची बातमी एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये News Paper आली आहे. महाराष्ट्रात वारकरी मंडळी व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करत आहेत आणि या बातमीमुळे सर्व वारकऱ्यांच्या आणि हिंदू Hindu धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. 

आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्यासोबत विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी फोनवर Telephone  चर्चा केली. संजय गायकवाड यांचे म्हणणे आहे की मुस्लिम Muslim समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मुस्लिम समाजात कोरोना पॉझिटिव Corona Positive संख्या कमी आहे आणि हिंदू धर्मीयांमध्ये मासाहाराचे प्रमाण कमी आहे म्हणून कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या जास्त आहे त्यांना या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला सांगितली तर ते आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगतात, असे गणेश महाराज शेटे यांनी सांगितले.

त्यांना आम्ही म्हटले आपले बोलणे योग्य नाही यामुळे वारकऱ्यांच्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. तर संजय गायकवाड म्हणतात मला कुणाच्या भावनांचे घेणे देणे नाही मला लोकांचे प्राण वाचवायचे आहेत तुम्हाला कोणाला मानायचे असेल तर माना पण मी कोणाला मानत नाही, असेही गायकवाड म्हणाल्याचा दावा शेटे यांनी केला आहे. Warkaris Angry over Shivsena MLA Sanjay Gaikwad Statement about Non Veg

''आमदार संजय गायकवाड यांच्या बोलण्याचा सरळ अर्थ हा निघतो युगा युगाचा शाकाहारी असणारा हिंदू सनातन धर्म मासाहाराच्याकडे वळावा. कोरोना मुळे तुमचा जीव वाचवण्याची भीती दाखवून आमदार संजय गायकवाड हे मांसाहाराकडे वळवण्याचा गोंडस प्रयत्न करत आहेत,'' असा आरोप वारकरी सेनेने केला आहे. पण त्यांचा प्रयत्न वारकरी हाणून पडल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

या वक्तव्याबद्दल आमदार गायकवाड यांनी जाहीर माफी मागावी, याकरिता आमदाराची फोनवर चर्चा केली असता ते म्हणतात मी माफी मागणार नाही. पण  चर्चा करायला तयार आहे तुम्ही म्हणाल तिथे मी येतो किंवा तुम्ही माझ्याकडे या पण लोक डाऊन च्या काळात घराच्या बाहेर निघणे ही शक्य नाही तर महाराष्ट्रातील कीर्तनकारांनी यांच्या भेटीला जावे तरी कसे आणि म्हणून आमदार संजय गायकवाड यानी कोणत्याही प्रकारची पळवाट न काढता जाहीर माफी मागावी आणि जर चर्चा करायची असेल तर सर्व वारकरी संघटनांतील प्रमुख किमान वीस कीर्तनकारांना गाडीचा पास काढून देऊन त्यांच्या वाहनाचा खर्च करून बुलढाण्याला बोलवावं आम्ही तिथेही चर्चा करायला तयार आहोत,'' असेही शेटे यांनी म्हटले आहे. Warkaris Angry over Shivsena MLA Sanjay Gaikwad Statement about Non Veg

कोरोना काळात वारकऱ्यांनी प्रशासनाला, सरकारला भरपूर सहकार्य केलेले आहे पण आमदारांकडून अशा प्रकारच्या बेताल वक्तव्य ची अपेक्षा नसून माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना थोडा समज देण्याची मागणीही विश्व वारकरी सेनेने केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com