सणासुदीच्या तोंडावर मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा इशारा

साम टीव्ही
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईला एक महत्त्वाचा इशारा देण्यात आलाय. कोणता आहे हा इशारा.वाचा सविस्तर

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईला एक महत्त्वाचा इशारा देण्यात आलाय. कोणता आहे हा इशारा.वाचा सविस्तर

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. सणासुदीच्या तोंडावर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवलीय. मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. 

मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याचा अलर्ट जारी करण्यात आलाय. दिवाळी हा मुंबईतला मोठा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी मुंबईकर मोठया प्रमाणावर घराबाहेर पडतात. यावेळी वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करु शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय.

मुंबईत छोटया ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आलीय. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवण्यात आलाय. यंत्रणा डोळ्यात तेल घालून सतर्क आहेतच पण आपण सर्वांनीही खबरदारी बाळगणं आवश्यक आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live