ही बातमी पाहा, आणि चिनी वस्तू हद्दपार करा...

साम टीव्ही
शनिवार, 6 जून 2020
  • भारतीय बाजारपेठेत चीनचा किती वाटा?
  • कोणत्या स्वरूपात आपल्या घरात शिरल्यात चिनी वस्तू?
  • ही बातमी पाहा, आणि चिनी वस्तू हद्दपार करा

चीन भारताविरोधात करत असलेल्या कुरापतींमुळे भारतात संतापाची लाट निर्माण झालीय. त्यातून चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या मोहिमेनं जोर धरलाय.

कोरोनाबाबत चीन करत असलेल्या लपवाछपवीमुळे जगभरात चीनविरोधात संतापाची लाट निर्माण झालीय. त्यातच भारतीय सीमेवर चीनकडून वारंवार कुरापती सुरूयत. त्यामुळे भारतात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेने जार धरलाय. मात्र आपल्या जगण्यात असलेल्या चिनी वस्तू आणि त्यांचा वाटा जर  पाहिला तर आश्चर्यानं बोट तोंडात जाईल. कारण

भारतीय बाजारात चिनी वस्तूंचा वाटा किती?

मोबाईल
भारतात उपलब्ध असलेल्या मोबाईल्समध्ये चिनी मोबाईल्सचा वाटा तब्बल 72 टक्के आहे. 

 दूरसंचार उपकरणं
भारतात दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि नव्याने विक्रीस असलेलेल्या चिनी उपकरणांचा वाटा 25 टक्के आहे. 

चिनी टेलिव्हिजन
भारतातील घरात असलेल्या टीव्हींमध्ये 51 टक्के टीव्ही चिनी कंपन्यांच्या आहेत. 

घरगुती उपकरणं
भारतात चिनी कंपन्यांनी बनवलेली घरगुती उपकरणांचा हिस्सा 12 टक्के आहे.

चिनी कार
भारतातील अॅटोमोबाईल क्षेत्रात चिनी बनावटीच्या कारचा वाटा 26 टक्के इतका आहे.

चिनी अॅप
मोबाईलमध्ये असलेल्या एकूण अॅप्सपैकी चिनी बनावटीची तब्बल 66 टक्के चिनी अॅप्स भारतातील नागरिक वापरतात.

सौरऊर्जा उपकरणं
सौरऊर्जा क्षेत्रात संपूर्ण भारतात चिनी उपकरणांचा वाटा तब्बल 90 टक्के इतका आहे.

चिनी औषधं
भारतात विक्री होत असलेल्या एकूण औषधांपैकी तब्बल 60 टक्के औषधं ही चिनी कंपन्यांनी बनवलेली आहेत.

मुळात, भारताने स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणामुळे परदेशी वस्तूंना भारतीय बाजारपेठ उपलब्ध झाली. मात्र, भारताला त्रास देणाऱ्या चीनसारख्या देशांचे लाड बंद करायला हवेत. भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचा वाटा जास्त असला तरी प्रत्येक भारतीयानं निर्धार केला तर चिनी वस्तू हद्दपार करणं सहज शक्य होईल. फक्त त्यासाठी करायला हवा भारतीय वस्तूंचा आग्रह आणि द्यायला हवी बॅन चायना मोहिमेला साथ.


संबंधित बातम्या

Saam TV Live