पाणी टंचाई हे दिव्यातील 8 नगरसेवकांचे अपयश, दिवेकारांचा आरोप

images
images

मुंबई - ठाण्यातील Thane दिवा Diva परिसरात पाण्यासाठी Water रहिवाशांची अक्षरश: वन वन होताना चे चित्र पाहायला मिळत आहे. तसं पाहिलं तर दिवा हे ठाणे शहरात मोडते. परंतु दिवा येथील काही भागात पाण्याचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. महिन्याला कमीत कमी पाच ते सात हजार रुपये इतका खर्च दिवेकर यांना पाण्यासाठी मोजावा लागत आहे. यासाठी पालिका प्रशासन Municipal administration आणि लोकप्रितिनिधींनी काहीतरी करावे आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशीच मागणी आता दिवा वासियांकडून केली जात आहे. Water scarcity is the failure of 8 corporators in Diva

ठाणे शहरातील दिवा येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाहायला मिळते. परंतु दिव्यातील काही प्रभागात पाण्याचा गंभीर प्रश्न रहिवाशांना भेडसावत आहे. या भागातील अनेक रहिवासी रोजंदारी वर्ग आहे. त्याच प्रमाणे बहुतांशी नागरिक हे मुंबई Mumbai तसेच ठाणे येथील छोट्या कंपन्यांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये कामानिमित्त जातात.

हे देखील पहा -

सध्या लॉकडाऊन Lockdown असल्यामुळे अनेक जणांना नोकऱ्या सोडून घरी बसावं लागला आहे. त्यातच पाण्यासाठी महिन्याला पाच ते सात हजार रुपये या नागरिकांना मोजावे लागतात. लॉकडाऊन मुळे घरी बसून महिन्याला पाच ते सात हजार रुपये पाण्याला भरायचे की घरखर्च चालवायचा असा सवाल आता दिव्यातील महिला वर्गाकडून केला जात आहे. Water scarcity is the failure of 8 corporators in Diva

एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी 70 रुपयांचा 20 लिटरचा बाटला हा दर दिवसाला मागावा लागतो. त्याचप्रमाणे घरातील वापरण्यासाठी पाणी 500 रुपयांनी हजार लिटर असे मागावे लागते. एकंदरीत हा सर्व खर्च एकूण जर पाहिला तर महिन्याला पाच ते सात हजार रुपये हा पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्यासाठी खर्च केला जातो. मग या नागरिकांनी पहावं तरी कोणाकडे असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

दिवावासियांच्या पाईपलाईनच्या नियोजनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून 200 ते 300 कोटींचा निधी पाच वर्षांपूर्वी देण्यात आला आहे. परंतु त्यानंतर ही दिव्यातील काही भागांमध्ये पाण्याच्या पाईपलाई तर आल्या मात्र पाण्याचा एक थेंबही आला नाही. या भागाला आठ नगरसेवक लाभले आहे आणि अद्याप या ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. Water scarcity is the failure of 8 corporators in Diva

गेल्या पाच वर्षापासून येथील रहिवाशांनी विविध आंदोलनं केली, मोर्चे काढले, त्याचप्रमाणे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा देखील केला. मात्र या रहिवाशांच्या हाती अपयश आलं आहे आणि हा  सर्व लोकप्रतिनिधींचा अपयश असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते रोहिदास मुंडे Rohidas Munde यांनी व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे एमआयडीसी कडून येणाऱ्या पाण्यामधील 7 एमएलडी पाण्याची चोरी होत हे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देऊन देखील दुर्लक्ष केलं जातं असून यामागे आर्थिक घोड नडल्याचा आरोप देखील मुंडे यांनी केला आहे. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com