पुणे शहरात पाणीपुरवठ्यात खोळंबा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.

पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.

महत्वाची बातमी : अजित पवारच उपमुख्यमंत्री...अखेर ठरलं?

बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही.

पेठांत मध्यरात्री पाणी
कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते.

प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे. 
- महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता 

तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत.
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका

Web Title: Water supply disrupted in Pune city
 


संबंधित बातम्या

Saam TV Live