नवी मुंबईत गुरुवारी, शुक्रवारी  पाणीपुरवठा बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणीपुरवठा विभागातर्फे गुरुवारी (ता.३) करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली विभागात पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाणीपुरवठा खंडित केल्यामुळे सिडको व कामोठे क्षेत्रातील रहिवासी परिसरातही पाणीपुरवठा होणार नाही. 

महापालिकेच्या मोरबे धरणातून शहराला रोज सुमारे ४०० दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते. ते पाणी मुख्य जलवाहिनीद्वारे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात आणून पाण्यावर प्रक्रिया करून, नंतर पुन्हा शहराला पुरवले जाते. मात्र, काही दिवसांपासून या केंद्रात बिघाड होऊ लागल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे जलशुद्धीकरणात तांत्रिक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी पाच ते सहा तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. गुरुवारी दिवसभर नवी मुंबईतील सर्व परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच कामोठे, खारघरच्या सिडको वसाहती आणि ग्रामीण भागातील नळजोडण्यांचे पाणी बंद होणार आहे. तर शुक्रवारी (ता.४) कमी वेळेकरिता कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. मात्र, पाण्याचा दाब कमी असल्याने दुसऱ्या दिवशीही अनेक भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्याकरिता नागरिकांनी घरात वापराकरिता मुबलक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

Web Title: Water supply in Navi Mumbai closed on Thursday, Friday
 
संबंधित बातम्या

Saam TV Live