akola
akola

लाट ओसरतेय; अकोल्यात ६२ टक्के खाटा रिक्त

अकोला : फेब्रुवारी महिन्यात सुरु झालेली कोरोनाची Corona  दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यामुळे अकोला Akola जिल्ह्यातील कोविड बाधितांसाठी आरक्षित आलेल्या ६२ टक्के खाटा Beds रिक्त आहे. त्यामुळे सध्या रुग्ण Patients व त्यांच्या नातेवाईकांची धावाधाव थांबली असून आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. Wave Is Fading In Akola 62 percent Of Beds Are Vacant

देशभरात कोरोना बाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजन Oxygen म्हणजेच प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने अभ्यासातून व्यक्त केला आहे. त्यामुळे या रोगाने ग्रस्त असलेल्यांना औषधोपचाराचा एक भाग म्हणून कृत्रीम प्राणवायू देण्यात येत आहे. परंतु राज्यासह जिल्ह्यात कृत्रिम ऑक्सिजनचा सुरुवातीच्या काळात पुरवठा न झाल्याने ते दगावल्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या. 

त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्वच जिल्ह्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा मुबलक साठा तयार ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. परिणामी बाहेरील जिल्ह्यातून अकोल्यात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता.

हे देखील पहा -

परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे कोरोनाबाधितांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या १ हजार ७१९ पैकी ६११ खाटांवरील रुग्णांचे उपचार सुरु असून १ हजार ५८ खाटा रिक्त आहेत. त्याची टक्केवारी ६१.५५ असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. 

अशी आहे जिल्ह्याची स्थिती -

- आयसीयूच्या २१० खाटा असून त्यापैकी ९३ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत,    तर ११७ खाटा रिक्त आहेत. 

- व्हेंटिलेटरच्या १०५ खाटा आहेत. त्यापैकी ७९ खाटांवर रुग्ण उपचार घेत            आहेत, तर ३६ खाटा रिक्त आहेत. 

- ऑक्सिजनच्या ९२८ खाटा आहेत. त्यापैकी ३४५३ खाटांवर रुग्ण उपचार घेत    आहेत, तर ५७५ खाटा रिक्त आहेत. 

- बिगर ऑक्सिजन अर्थात सामान्य श्रेणीच्या ४७६ खाटा आहेत. त्यापैकी १४९      खाटांवर रुग्ण उपचार घेत असून ३२७ खाटा रिक्त आहेत.  

Edited By : Krushnarav Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com