दोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार

pune raje
pune raje

पुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या छत्रपती संभाजीराजे Shambhaji raje आणि छत्रपती उदयनराजे Udayanraje यांच्यातील बैठक आज अखेर पार पडली आहे. येत्या 16 तारखेला मराठा क्रांती मूक आंदोलनाची हाक संभाजीराजेंनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजांनी आज उदयनराजेंची पुणे Pune येथे भेट घेतली.  We will fight together on the issue of Maratha reservation

गेले अनेक दिवस छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्रातील विविध नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. त्यापूर्वी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी दौरा केला आहे. जनसामान्यांची मते जाणून घेऊन, ती शीर्ष नेतृत्वा पर्यंत पोचवण्याचे काम छत्रपती संभाजीराजे करत आहेत. त्यापैकीच ही आजची भेट. 

ह्या बैठकीत संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासारख्या महत्वूर्ण विषयावर चर्चा केली. महाराष्ट्रातील संपूर्ण समाज एकवटला असून, संभाजीराजेंनी तो एक करण्यासाठी जो पुढाकार घेतला, त्याचे कौतुक होत आहे. 

या भेटीनंतर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी एकत्रच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संभाजीराजे म्हणाले, दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. दोन्ही घराण्यांमध्ये कोणतंही दुमत नाही. या भेटीने आनंद झाला. मराठा समाजासाठी आम्ही एकमताने काम करत आहे. आता मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पेटिशनची गरज नाही, असा अहवाल भोसले समितीने दिला आहे. राष्ट्रपतींच्या मार्फत ३३८ ब च्या अंतर्गत मागास आयोगाला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिफारस केली जावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. पुढे १६ तारखेच आंदोलन होणार असून राज्य सरकारने मराठा समाजाच्या ६ मागण्या मान्य कराव्यात. सुपरन्यूमररी पद्धत वापरावी, याआधी देखील या पद्धतीचा राज्यात वापर केला गेला आहे. We will fight together on the issue of Maratha reservation

हे देखील पहा -

उदयनराजे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर चालढकल करणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘माझा पाठिंबा संभाजीराजेंना आहे. मराठ्यांना आरक्षण हे एकच ध्येय आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली. निवडून आलं म्हणजे आपलं सगळं असं समजू नका. लोकशाहीचे हे राजे आहेत, त्यांना जाब विचारला पाहिजे. माझं ठाम मत आहे, आडवा आणि गाडा, जाब विचारा.. सुरुवात माझ्यापासून करा. आमच्या वाड्यावर येऊन विचारा. माझ्याप्रमाणे सर्वांना विचारा...खरं खोटं करा.. किती काळ संभ्रमावस्थेत ठेवणार, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.  

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या ?

१) ९ सप्टेंबर 2020 च्या आधीच्या उमेदवारांना नियुक्ती देऊन टाका.

२) शाहू महाराजांच्या नावाने उभं केलेल्या सारथीसाठी कमीत कमी १ हजार कोटी द्यावे. मुख्यमंत्री म्हणाले जागा दिलीये, पण नुसतं जागा देऊन काय होणारे ? तिथं चांगली लोकं द्या…नाही तर रद्द करून टाका, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.

३) अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुन्हा उभारणी करा.

४) प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तयार करा, हे राज्य सरकारच्या हातात आहे. ते तरी करा

५) ७० टक्के गरीब मराठा समाजाची चुक काय ? मराठा समाज देखील बहुजनांचा घटक त्यांनाही सवलती द्या !

६) सुपरन्यूमररी पद्धतीने मराठा समाजाला शिक्षणासह इतर सवलती लागू कराव्यात.

Edited By - Shivani Tichkule
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com