WEB विशेष | कोरोनाच्या सगळ्या शंकांचं निरसन या एका क्लिकवर...

WEB विशेष | कोरोनाच्या सगळ्या शंकांचं निरसन या एका क्लिकवर...

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेत. रुग्णांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातेय. पण त्याआधीच सगळ्यांमध्ये भीती पसरली आहे... ती कोरोनाबद्दलच्या अफवांची.

कोणत्या आहेत या अफवा आणि त्यांच्यापासून कसा कराल स्वतःचा बचाव, यावर बोलुयात वेब विशेषमध्ये..

पाहा व्हिडीओ - 

कोरोनाची सगळ्यात कॉमन शंका आहे. मास्कबद्दलची मास्क घातल्यानं कोरोनापासून बचाव होतो का?

खरंतर प्रत्येकानं मास्क वापरण्याची गरज नाही. तुम्ही जर कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात येणार असाल. तर आणि तरच मास्क वापरण्याची नितांत गरज आहे. तसंच सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणं असतील तर मास्क घालावा.

दुसरी गोष्ट म्हणजे मास्क वापरत असाल तर तुम्हाला तो लावायचा कसा आणि काढायचा कसा याची नीट माहिती असली पाहिजे.. एकदा वापरलेला मास्क पुन्हा वापरू नका. तोंडाला मास्क लावताना-काढताना काळजी घ्या...

तोंडाला मास्क लावण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. मास्क काढताना त्याच्या समोरच्या भागाला हात लावू नका. मागच्या दोऱ्यांना पकडून मास्क काढा. मास्क काढल्यावर लगेच तो कचरापेटीत टाका. त्यानंतर हँडवॉश किंवा साबणाने हात स्वच्छ धुवून घ्या.
यानंतर येते दुसरी शंका. कोरोना विषाणू माणसानं बनवलाय का?, असा प्रश्न सध्या प्रत्येकाला पडलाय. पण हे खरंय की खोटंय?

गेल्या 30 वर्षात 3 नवे वायरस आढळले. सार्स, मार्स आणि आत्ताचा कोविड-१९ म्हणजेच कोरोना. कोरोना या तिघांचं एकच जैविक कुटुंब आहे. दिसायला कोवीड-१९ हा सार्ससारखाच आहे.

हा वायरस कुठून जन्माला आलाय, याचा सध्या शोध सुरु आहे. पण या वायरसचा उगम वटवाघुळांपासून झाल्याचा संशय आहे. कोरोना वायरसपासून बचावासाठी अजूनतरी कोणतंही ठोस औषध सापडलेलं नाहीये. 

तिसरी शंका आहे... माणूस मरण्याची. कोरोनाची लागण झाल्यानं माणूस लगेच मरतो, अशी अनेकांनी धास्ती घेतली आहे. पण खरंच असं होतं का?
कोरोना विषाणूची लागण होणं हा इतर आजारांच्या तुलनेत बराच सॉफ्ट आजार आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचं प्रमाण आणि यातील मृतांचं प्रमाण बघितलं तर कोरोनाचा मृत्यूद...र फक्त २ टक्के आहे. हे दोन टक्के मृतही १८ ते २० टक्के गुंतागुंतीच्या स्थितीत दाखल झालेल्या रुग्णांपैकी आहेत. 
कोरोनापेक्षा काही वर्षांपूर्वी आलेल्या इबोलाचा मृत्यूदर हा सर्वाधिक म्हणजे १० टक्के होता. 

कोरोना लागण झालेल्या रुग्णांचा रिकवरी रेट म्हणजे प्रकृती सुधारण्याचं प्रमाण ९८ टक्के आहे. म्हणजेच काय तर कोरोना बरा होतो. कोरोना इतर संक्रमित आजारांच्या तुलनेत वेगाने पसरत असल्याने अर्थातच मृतांची संख्या अधिक दिसते. यंदा ऑक्टोबरमधे सिजनल फ्लू आला आणि वीसेक लाख अमेरिकन नागरिकांना त्याची लागण झाली. त्यात १० हजार जणांचा जीव गेला. पण त्याची इतकी चर्चा झाली नाही. कारण, या आजारात काहीही नावीन्य नव्हतं.


चीनहून आलेल्या चिनी वस्तूंमुळे कोरोना होतो? अशीही एक शंका उपस्थित केली जातेय. खरंतर बाहेरच्या वातावरणात कोरोनाच वायरस फार वेळ तग धरु शकत नाही. त्यामुळे अशी शंका घेताना एकच लॉजिक वापरलं जाऊ शकतं. चीनहून वस्तू पॅक होऊन भारतात ती किती दिवसांनी दाखल झाली, यावर बरंच काही अवलंबून आहे.
पाचवी शंका आहे नॉनवेजवर. नॉनवेज अर्थात मांसाहाराने कोरोनाची लागण होते, अशीही चर्चा सध्या जोरात आहेत. पण खरंत असं आहे का?


कोरोना आला तो चीनच्या वुहान शहरातून.. तिथे विविध प्राण्यांचं मांस उपलब्ध करून देणारा मोठा बाजार आहे. या बाजारातूनच वटवाघळाचे किंवा सापाचे मांस खाल्ल्याने कोरोनाचा उद्भव झाला, अशी एक थिअरी मांडण्यात आली. पुढे मांस आणि चिकन खाण्यापर्यंत ती ताणली गेली. 

पण कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. मटण, चिकन खाण्याचा या आजाराशी काहीही संबंध नाही, हे स्पष्ट झालंय. त्यामुळे मांसाहाराने कोरोना होतो, ही बाब निव्वळ अफवा आहे. 

सहावी शंका आहे, औषधांवरची... 

एन्टीबायटीक्समुळे कोरोना बरा होता का? नाही! अँटिबायोटिक्स वापरून आपण कोरोनावर उपचार करू शकत नाही. वायरस आणि बॅक्टेरिया हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म जीव आहेत. बॅक्टेरियासाठी अँटिबायोटिक्स ट्रिटमेंट केली जाते तर वायरससाठी अँटिवायरल मेडिकेशनवर भर दिला जातो.

यातूनच एक नवी शंका घेतली जाऊ लागली. तिळाचं तेल लावल्यानं कोरोना वायरस शरीरात जात नाही, असा दावा केला गेला. पण हे कितपत खरंय?

कोणत्याही तेलाने कोरोना वायरस रोखता येत नाही. अजूनही असा कोणताही शोध लागलेला नाही. त्यामुळे तिळाच्या तेलाने कोरोनाला रोखता येतं, असा दावा धादांत खोटाय. कोरोनाची सगळ्यात जास्त धास्ती वयोवृद्धांनी घेतली. त्यामुळे फक्त वृद्धांनाच कोरोनाची लागण होते, अशीही शंका उपस्थित केली जातेय. पण असं नाहीये. कोरोना कोणत्याही व्यक्तिला होऊ शकतो. वृद्ध आणि बालकांना त्याचा धोका अधिक असतो, इतकंच. 

प्राण्यामुळे कोरोनाची लागण होते, अशीही शंका घेण्यात आली आहे. त्यामुळे प्राणी पाळणाऱ्यांनीही धास्ती घेतली आहे. या गोष्टीची अजूनतरी पुष्टी झालेली नाही. सध्यातरी माणसांपासून माणसांनाच त्याची लागण होतेय.

शेवटची शंका आहे, मेड ईन चायना. ही शंका मुळातच फार बाळबोध आहे. कोरोना वायरस मेड इन चायना आहे, म्हणून तो फक्त चीनी लोकांनाच होतो, असं म्हणणं अगदीच चुकीचं आहे. कोरोनाची लागण अगदी कुणालाही होऊ शकते.  चीनमधे त्याचा पहिला उद्भव झाला, एवढाच त्याचा आता चीनशी संबंध आहे. 

काळजी करत बसण्यापेक्षा नको त्या अफवा पसरवण्याआधी खबरदारी बाळगा. काळजी घ्या...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com