परमवीर सिंह यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा 

परमवीर सिंह यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा 
Parambir Singh - Mayuresh Raut

वसई /विरार : माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिंबिरे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंध खात्याला तक्रार करणाऱ्या विरार मधील  मयुरेश राऊत याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि एम आर टीपी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. Offence Registered against Complainant who stood Against Parambir Singh
 
तुळींज पोलिसांनी माहिती दिली की, वसई विरार महानगर पालिका प्रभाग समिती ब चे अनधिकृत बांधकामचे लिपिक अक्षय मोखर (२९) यांनी गुरवारी तुळींज पोलीस ठाण्यात नालासोपारा पूर्व विजय नगर येथे मौजे तुळींज सर्वे क्रमांक २२१ हिस्सा क्रमांक १ येथे बनावट बांधकाम परवाने तयार करून ४ मजली इमारत बांधून शासनाची आणि ग्राहकांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखिल पहा

यात भारतीय दंड संहीता कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम ५२, ५३, ५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इतर भागीदारांवर सुद्धा गुन्हा नोंदविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. Offence Registered against Complainant who stood Against Parambir Singh

मयुरेश राऊत हे मनसुख हिरेन प्रकरणानंतर प्रकाशात आले होते. त्यांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिंबिरे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंध खात्याला तक्रार करत आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com