काश्‍मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

श्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.

सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार काल सायंकाळीच परिसराची नाकाबंदी करून वेढा घातला. त्यानंतर तपास मोहीम सुरू केल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार होऊ लागला. यात दोन दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, ते कोणत्या संघटनेसाठी काम करत होते, हे गुरुवारी सायंकाळपर्यंत समजू शकले नाही.

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात या वर्षी जवानांनी केलेल्या कारवाईत 235 दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये स्थानिक दहशतवाद्यांचाही समावेश आहे.

Web Title: two militants killed at jammu and kashmir

संबंधित बातम्या

Saam TV Live