अंगुरी भाभी शिल्पा शिंदे हीचा काँग्रेस प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

मुंबईः 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री व 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (मंगळवार) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबईः 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री व 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (मंगळवार) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पुढे बिग बॉसच्या दहाव्या पर्वात प्रवेश केल्यावर विजेती ठरली. बिग बॉसच्या विजेतेपदामुळे तिच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झाले होते. बिग बॉस जिंकल्यानंतर शिल्पा शिंदे पुढे सुनील ग्रोव्हरच्या क्रिकेटवर आधारित वेब सीरिज ‘जिओ धन धना धन’ मध्ये झळकली होती. सुनीलची पत्नी गुगली देवीची भूमिका तिने निभावली होती. एका मराठी कार्यक्रमात लावणी डान्स करतानाही ती दिसणार आहे.

शिल्पा शिंदेचा जन्म महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय घरात 28 ऑगस्ट 1977 रोजी झाला आहे. तिचे वडील डॉ सत्यदेव शिंदे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. शिल्पाच्या वडिलांना तिने कायद्याचे शिक्षण घ्यावे, अशी इच्छा होती. पण शिल्पा शिंदेला अभिनेत्री व्हायचे होते व संधीचं सोनं करत यशस्वी अभिनेत्री झाली. 2013 रोजी तिच्या वडिलांचे निधन झाले.

शिल्पा शिंदेने टीव्ही शो ‘भाभीजी घर पे है’ मधून छोट्या पदड्यावर पदार्पण केले होते. अल्पावधीत तिचं अंगुरी भाभी पात्र लोकांच्या घराघरात पोहोचले व चर्चेत आली होती. प्रकृतीचं कारण देत शिल्पा शिंदेने शोमधून एक्झिट घेतली होती. कराराचे उल्लंघन केल्याने तिच्यात आणि निर्मात्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. प्रोडक्शन टीमचे लोक सारखे त्रास देतात. काहीजण करिअर संपवण्याची धमकी देतात असा आरोप शिल्पाने केला होता. यानंतर निर्माता बिनफेर कोहली यांनी सिन्टामध्ये शिल्पा शिंदेविरोधात तक्रार केली होती. यानंतर सिन्टाने नॉन कॉर्पोरेशन सर्क्यूलर काढण्याचा निर्णय घेतला होता ज्यामुळे शिल्पा भविष्यात कोणत्याही चॅनेल किंवा निर्मात्यांसोबत काम करु शकत नसल्याचा उल्लेख होता.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे शिल्पा शिंदे निवडणुकांच्या रिंगणात उतरणार, की स्टार प्रचारक होणार, हे येत्या काळात समजेल. मात्र काँग्रेस तिच्या लोकप्रियतेचा लाभ करुन घेणार, यात शंका नाही.

Web Title: actress shilpa shinde joins congress


संबंधित बातम्या

Saam TV Live