ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 डिसेंबर 2019

तब्बल ५० वर्षे अव्याहतपणे व्यगंचित्रकलेची सेवा करणारे व राजकीय व्यंग हेरून कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे आज रात्री मुंबईत अल्पशा आजाराने (वय 69) निधन झाले.

 

 

मुंबई : तब्बल ५० वर्षे अव्याहतपणे व्यगंचित्रकलेची सेवा करणारे व राजकीय व्यंग हेरून कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे आज रात्री मुंबईत अल्पशा आजाराने (वय 69) निधन झाले.

विकास सबनीस आज रात्री हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते. तिथेच त्यांची प्रकृती ढासळली व त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील.

विकास सबनीस हॉस्पिटलमध्ये नियमीत तपासणीसाठी गेले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. विकास सबनीस यांनी ५० वर्षे केवळ व्यंगचित्रकला जोपासली. बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यांच्यानंतर विकास सबनीस हेच खरे व्यंगचित्रकार म्हणून जगले असे गौरोवोद्गार महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विकास सबनीस यांच्या कारिकिर्दीला ५० वर्षे झाल्यानंतर काढले होते.

Web Title: Cartoonist Vikas Sabnis Passes Away


संबंधित बातम्या

Saam TV Live